हृदयरोगापासून रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यापर्यंत, फायदेशीर ठरतील ‘शेवग्याची पाने’

शेवग्याची पाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. शेवग्याच्या पाण्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.

हृदयरोगापासून रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यापर्यंत, फायदेशीर ठरतील ‘शेवग्याची पाने’
शेवग्याची पाने

मुंबई : शेवग्याची पाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. शेवग्याच्या पाण्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. यामध्ये अँटी-फंगल, अँटी-व्हायरल, एंटी-डिप्रेससेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यासाठी याचा आहारात समावेश केला पाहिजे. आपल्यापैकी अनेकजण आहारात शेवग्याच्या शेंगा घेतात. मात्र, शेवग्याच्या शेग्यांपेक्षाही शेवग्याची पाने आपल्या निरोगी शरीरासाठी फायदेशीर आहेत. (Drumstick leaves are beneficial for strengthening the immune system)

शेवग्याच्या पानात भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे बर्‍याच रोगांपासून बचाव होतो. याव्यतिरिक्त, आयुर्वेदात शेवग्याची पाने अमृतसारखी मानली जातात. याचा उपयोग बरेच औषधे तयार करण्यासाठी केला जातो. तसेच यात प्रथिने, जीवनसत्व बी 6, व्हिटॅमिन सी, लोह, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम यासारखे पोषक असतात. शेवग्याची पाने आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखतात.

मधुमेहाच्या रूग्णासाठी शेवग्याची पाने फायदेशीर असतात. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होतात. परंतु शेवग्याच्या पाण्यांचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्टेरॉलचे पातळीवरील नियंत्रण असते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शेवग्याच्या पानात भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात, जे आपल्याला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. या व्यतिरिक्त हे पूर्वीच्या आजाराचा धोकाही कमी करते.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण शेवग्याच्या फुलांचा चहा घेतला पाहिजे. शेवग्याच्या पानांची पावडर बाजारात सहज मिळते. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर आपण ते पाण्यात मिक्स करून पिऊ शकता.
शेवग्याच्या शेंगेमध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्याला हंगामी

संक्रमणापासून वाचवतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटामिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यासारखे पोषक घटक असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याची शेंग खूप फायदेशीर ठरते. या झाडाच्या शेंग, साल आणि पानामध्ये मधुमेहाला प्रतिबंधित करणारे गुणधर्म आहेत. याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळते.

संबंधित बातम्या : 

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!

(Drumstick leaves are beneficial for strengthening the immune system)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI