Oats Benefits | ओट्सचे सेवन करा आणि विविध व्याधी दूर करा

Oats Benefits | ओट्सचे सेवन करा आणि विविध व्याधी दूर करा
ओट्स

मुंबई : कोरोना महामारीने आपणाला बऱ्याच गोष्टींचा धडा दिला आहे. याआधी आपण रस्त्यावर कुठेही खाद्यपदार्थांची गाडी दिसली तरी पुढे होऊन तेथील पदार्थ खाण्याला पसंती द्यायचो. आता आपण फार काळजी घेत आहोत. आपला आहार आरोग्यदायी कसा राहील, याकडे आपण लक्ष द्यायला लागलो आहोत. ज्या पदार्थांमध्ये अधिक पोषक तत्त्वे आहेत, त्याच पदार्थांचा आपल्या आहारात अधिकाधिक समावेश करण्यास  प्राधान्य देऊ लागले आहेत. (Eat oats and get rid of various ailments)

अनेक जण गव्हाच्या पिठाऐवजी ओट्सच्या पिठापासून बनवलेली भाकरी व इतर गोष्टींचे सेवन करतात. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहित आहे की ओट्स आपल्या साधा आहाराचे निरोगी आहारामध्ये रूपांतर करतो. हे इतर अनेक धान्यांपेक्षा अधिक फायदेशीर आहे. त्यामुळेच कोरोना महामारीत लोक ओट्सच्या पिठाचे सेवन करण्यास प्राधान्य देत आहेत.

100 ग्रॅम ओट्समध्ये किती पोषक तत्वे मिळतात

कॅलरी : 389
पाणी : 8%
प्रोटीन : 16.9 ग्रॅम
कार्ब्सन : 66.3 ग्रॅम
साखर : 0 ग्रॅम
फायबर : 10.6 ग्रॅम
चरबी: 6.9 ग्रॅम

ग्लूटेनमुक्त असतात ओट्स

आपल्या शरिरातील विविध व्याधींना ग्लुटेन कारणीभूत असते. त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेताना ग्लुटेनमुक्त पदार्थ खायला पसंती दिली पाहिजे. अन्यथा आपल्याला पोटदुखी यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. ओट्सदेखील ग्लुटेनमुक्त पदार्थ आहे. त्यामुळे विविध व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी ओट्सचे सेवन उपयुक्त ठरेल.

ओट्सचे पीठ अधिक गुणकारी

सामान्यत: घरांमध्ये गहू आटा किंवा इतर आटाचा वापर केला जातो. तुलनेत ओट्सच्या वापराचे प्रमाण कमी आहे. मात्र आपण नेमकी हीच चूक करतो की अधिक गुणकारी असलेल्या ओट्सचा तुलनेत कमी वापर करतो. ओट्सचे पीठ अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते हे लक्षात घ्या.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणते

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओट्सचे सेवन अधिक फायदेशीर असते. ओट्समुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. ओट्समध्ये व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सीडेंट, फायबर, डायटरी फायबर आणि मिनरल्स असते. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. बॅड कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचे प्रमाणामुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांनी ओट्सचे अवश्य सेवन करावे. त्याचबरोबर पचन व्यवस्था सुस्थितीत ठेवणे, ह्रदयविकाराचा धोका कमी करणे यासाठीही ओट्स उपयुक्त आहे. (Eat oats and get rid of various ailments)