AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात घ्या ‘ही’ फळे, होतील अनेक फायदे!

संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. अनेकजन या कोरोनामुळे मरत देखील आहेत.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात घ्या 'ही' फळे, होतील अनेक फायदे!
| Edited By: | Updated on: Apr 21, 2021 | 10:50 AM
Share

मुंबई : संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. दररोज येणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहूण धक्काच बसत आहे. प्रत्येकजन कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला हेल्दी आहार घ्यावा लागणार आहे. (Eat these foods in diet to boost the immune system during the corona period)

आपल्या आहारात ताज्या फळांचा समावेश करा. यासह, आपल्याला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्स मिळतील असेच आहारामध्ये घ्या. उन्हाळ्यात तुम्ही आंबा, सफरचंद, केळी आणि बीट हे तर खायलाच पाहिजे. कोरोना या काळात हिरव्या भाज्या, रताळे, शेंगदाणे, मका, बाजरी आहारात घेतले पाहिजे. उन्हाळ्याच्या हंगामात आपण दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता पूर्ण होईल. याशिवाय  झोप चांगली असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती आणखीनच वाढतो.

राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी तयार करून आपण खाऊ शकतो. तसेच सूपमध्ये देखील राजमा मिक्य करू शकतो. राजमा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रथिन्यांची पातळी चांगली राहते. रात्री राजमा पाण्यात भिजवून सकाळी आपण खाऊ शकतो. दूध हे बर्‍याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर दिला पाहिजे.

आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eat these foods in diet to boost the immune system during the corona period)

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.