बदाम खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा !

त्वचा कोरडी पडण्याची समस्या आता सामान्य झाली आहे.

बदाम खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे नक्की वाचा !
दररोज सकाळी खा भिजलेले 5 बदाम, मेंदूसाठी अधिक फायदेशीर

मुंबई : त्वचा कोरडी पडण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. परंतु, काही लोकांची त्वचा इतकी कोरडी होते की, त्यांच्या त्वचेवर मॉइश्चरायझरपासून बाजारात मिळणारी सर्वात महाग उत्पादने देखील फार काळ काम करत नाहीत. कोरडी त्वचा दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल. (Eating almonds is good for your health)

-चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पेस्ट किंवा बदामाचे दुधाचा वापर आपण करू शकता. यासाठी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भिजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

-आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन कप बदामाचे दूध मिक्स करा. यामुळे कोरड्या, निस्तेज, निर्जीव त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. त्वचेला येणारी खाज देखील कमी होईल. बदामातील पोषण तत्त्वांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.

-बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड भरपूर असते. हे घटक आपल्या त्वचेसाठी पोषक आहेत. बदाम तेलाच्या उपयोगामुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते.

-प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. यामुळे पोटाच्या आसपासची चरबी कमी होते.

-बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते, असे नेहमी म्हटले जाते. बदाम खाल्ल्याने फक्त स्मरणशक्तीलाच नाही तर शरीरालाही अजून अनेक फायदे होतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Eating almonds is good for your health)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI