AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपाशी पोटी ‘लसूण’ खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचा याबद्दल अधिक !

सध्याच्या कोरोना काळात लसूण खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

उपाशी पोटी 'लसूण' खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचा याबद्दल अधिक !
लसूण
| Edited By: | Updated on: Apr 30, 2021 | 7:49 AM
Share

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात लसूण खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लसूण खाण्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि लसूण आपल्याला अनेक रोगांपासून दूर देखील ठेवतो. लसूणमध्ये अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटी ऑक्सिडंट आहेत. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. (Eating garlic on an empty stomach is beneficial for health)

1. लसूणमधील प्रथिने – 6.3 टक्के,

2. चरबी – 0.1 टक्के,

3. कार्ब – 21 टक्के,

4. खनिज – 1 टक्के,

5. लोह – 0.3 टक्के

6. जीवनसत्त्वे – ए, बी, सी

लसूण या आजारांसाठी फायदेशीर 

श्वसनाच्या समस्या – श्वसन समस्यांसाठी आपण लसूण घेऊ शकता. लसणाच्या कळीला मीठाबरोबर खाल्ल्याने फायदा होतो.

कोलेस्ट्रॉल- लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाऊ शकता. असे केल्याने हृदय निरोगी राहते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

पोटाचे रोग – लसूण सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. लसण्याच्या रसाबरोबर तुम्ही मीठ, तूप आणि भाजलेली हिंग खाऊ शकता. हे आपल्या पाचक प्रणालीस ठीक ठेवण्यास मदत करते.

रक्तदाब समस्या – लसणाच्या सेवनामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब समस्या आहे. त्यांच्यासाठी खूप लसूण खूप फायदेशीर आहे.

अल्झायमर – या रोगाच्या दरम्यान, स्मरणशक्ती कमी होऊ लागते. हा रोग बहुतेक वेळेस म्हातारपणात होतो. लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हा रोग रोखण्यास ते मदत करतात. म्हणून, लसणाच्या सेवनाने हा रोग रोखू शकतो.

कर्करोग – लसूणमध्ये अँटी-कर्करोग घटक असतात. ते कर्करोगापासून संरक्षण करण्यात मदत करतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. म्हणून, आपल्या आहारात लसूणचा समावेश करून कर्करोग देखील टाळता येऊ शकतो.

सर्दी व ताप – लसूणमध्ये औषधी गुण आहेत. याचे सेवन केल्याने आपणास सर्दी व तापापासून संरक्षण मिळते. यासाठी दररोज सकाळी कच्चा लसूण रिकाम्या पोटी खाल्ला पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Eating garlic on an empty stomach is beneficial for health)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ