तुमचं वजन वाढतंय? रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे तर वजन वाढत नाही ना?; वाचा सविस्तर!

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये बदल करा. वेळेवर अन्न खाल्ल्याने पचन मजबूत होते आणि चयापचय वाढविण्यास मदत होते.

तुमचं वजन वाढतंय? रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे तर वजन वाढत नाही ना?; वाचा सविस्तर!
वाढलेले वजन

मुंबई : जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये बदल करा. वेळेवर अन्न खाल्ल्याने पचन मजबूत होते आणि चयापचय वाढण्यास मदत होते. चयापचय दर वाढल्यामुळे वजन कमी होते. म्हणून वेळेवर आहार घेणे फार महत्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून एका तासाच्या आतमध्ये नाश्ता केला पाहिजे. रात्रीचे जेवन देखील लवकर केले पाहिजे, हे केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. (Eating late at night leads to weight gain)

रात्री उशिरा जेवणे चुकीचे

रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि सौम्य, पचन करणे सोपे आणि कमी कॅलरी युक्त असावे. रात्रीच्या जेवणातील जड पदार्थ आपल्याला बर्‍याचदा अस्वस्थ करतात आणि आपल्या झोपेत अडथळा आणू शकतात. यामुळे जठरासंबंधी समस्या देखील वाढवू शकतात. विशेष म्हणजे रात्रीचे जेवण आपण लवकर केले पाहिजे. यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि लठ्ठपणा देखील वाढत नाही. शक्यतो 7.30 च्या अगोदर रात्रीचे आपले जेवण झाले पाहिजेत.

रात्री उशिरा जेवल्याने हे नुकसान होतात

रात्री उशिरा जेवण केल्याने आरोग्याला अनेक नुकसान होतात. विशेष म्हणजे रात्री उशिरा जेवल्याने वजन झटपट वाढते. रात्री चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने अपचन, वायू आणि पोटाची समस्या उद्भवू शकते. उशिरा जेवल्याने झोप लवकर लागत नाही. त्यामुळे दिवसभर चिडचिड वाढते. यामुळे अशक्तपणा वाढण्याची देखील शक्यता आहे. पाचक प्रणाली सुधारण्यासाठी उच्च फायबर आहार आवश्यक आहे. फायबरच्या मदतीने आपण जे अन्न खातो ते पचन योग्य प्रकारे होते.

हेल्ही आहार

सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. जेवणाची वेळ ठरवा आणि बाहेरील अन्न खाणे पूर्णपणे टाळाच. सकाळचा नाश्ता ते दुपारच्या जेवणादरम्यान फळं, नारळाचे पाणी, रस, ताक असे काहीतरी सेवन करा. दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 विनातेल चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती बार्ली, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला. दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी सोबत संध्याकाळच्या नाश्त्यात भाजलेले चणे, ढोकळा, डोसा यापैकी एखादा पदार्थ खा.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Eating late at night leads to weight gain)