AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्ची केळी खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, वाचा

जर तुमचा आहार चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही चांगले राहते. आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो.

कच्ची केळी खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे, वाचा
| Edited By: | Updated on: Mar 13, 2021 | 9:01 AM
Share

मुंबई : जर तुमचा आहार चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही चांगले राहते. आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. चांगल्या आरोग्यासाठी, आपण अधिकाधिक फळांचे सेवन करतो. केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये बरेच पोषक घटक देखील असतात, जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करतात. केळी हे जगभरात खाल्ले जाणारे फळ आहे. मात्र, आपण जास्त करून पिवळ्या रंगाची केळीच खातो परंतू तुम्हाला हे माहिती आहे का की, हिरव्या रंगाची केळी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Eating raw bananas is beneficial for health)

-हिरव्या केळीत फारच कमी कॅलरी असतात, म्हणून हे तुमचे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त ठरू शकते. या केळींचे सेवन केल्याने पोट बर्‍याच वेळेसाठी भरलेले राहते, ज्यामुळे आपण जास्त अन्न खाणे टाळतो आणि यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो.

-कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीरातील मलनि:सारण प्रक्रिया नीट होते. याशिवाय कच्च्या केळीमुळे हाडं मजबूत बनण्यासही मदत होते.

-मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.

-कच्च्या केळात फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं.

संबंधित बातम्या : 

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

आजारांपासून दूर राहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 7 घरगुती उपाय

(Eating raw bananas is beneficial for health)

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.