पालक खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल सविस्तर

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे.

पालक खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल सविस्तर
पालक
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 11, 2021 | 1:34 PM

मुंबई : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकमध्ये ‘अ’ जीवनसत्व असते. त्यामुळे श्वसनासंबंधिच्या रोगांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. रोज एक कप पालकाचा रस घेतला तर उपयुक्त ठरू शकते. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पालकमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुणांसाठी पालकाचं सेवन करणं महत्वाचं आहे. (Eating spinach boosts immunity)

पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्सला बाहेर काढण्यास मदत होते. या फ्री रेडिकल्समुळे कॅन्सरसारखे रोग होतात. पालकमध्ये ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात.

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पालकाचं सेवन करा. पालकमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. दररोज सकाळी पालकाचा रस घेतला तर वजन कमी होतेच मात्र, यामुळे आपली त्वचा देखील चांगली होते. त्वचेसंदर्भातील अनेक समस्या देखील पालकामुळे दूर होण्यास मदत होते.

पालकाचा रस आणि नारळ पाणी एकत्र करून पिले तर मुतखड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. डाॅक्टर अनेक लोकांना कच्चे पालक खाण्याचा सल्ला देतात कारण कच्चे पालक खाण्याने अनेक आजार दूर होण्यास मदत होते. कच्छ पालकही खूप गुणकारी आहे. यामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहते म्हणून शक्य असेल तेव्हा कच्चे पालक खाल्ले पाहिजे.

( टीप-  डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या )

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Eating spinach boosts immunity)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें