जास्त मासे खाणाऱ्यांना होऊ शकतो ‘स्कीन कॅन्सर’;जाणून घ्या, कोणते मासे असतात अधिक घातक.. किती प्रमाणात खावे मासे

मासे खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक जास्त मासे खातात त्यांना कर्करोगाचा धोका वाढू शकतो. हे संशोधन कोणी केले आहे आणि माशांच्या अतिसेवनामुळे कोणत्या आजाराचा धोका वाढतो? याबद्दल जाणून घेऊ.

जास्त मासे खाणाऱ्यांना होऊ शकतो ‘स्कीन कॅन्सर’;जाणून घ्या, कोणते मासे असतात अधिक घातक.. किती प्रमाणात खावे मासे
महादेव कांबळे

|

Jul 04, 2022 | 7:20 PM

मुंबईः मांसाहार करणाऱ्या लोकांच्या आहारात अंडी, चिकन, मटण, मासे इत्यादींचा समावेश होतो. त्यापैकी सर्वाधीक प्रथिने (Most protein) मासेमध्ये आढळतात. तज्ज्ञांच्या मते, मासे खाल्ल्याने शरिरासाठी अनेक फायदे होतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मासे खाल्ल्याने एखाद्या गंभीर आणि प्राणघातक आजाराचा (Of a terminal illness) धोका वाढू शकतो. अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरण त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान करतात, ज्यामुळे बहुतेकांना स्कीन कॅन्सर (Skin cancer) संभवतो. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, मासे खाल्ल्याने ‘मेलेनोमा’ चा धोका वाढू शकतो, जो एक प्रकारचा कर्करोग आहे. ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे आढळून आले की, जे लोक दर आठवड्याला 300 ग्रॅम मासे खातात त्यांना प्राणघातक ‘मेलेनोमा’चा धोका 22 टक्के जास्त असतो. या संशोधनात ६२ वर्षे वयाच्या ४ लाख ९१ हजार ३६७ प्रौढांनी भाग घेतला.

त्यांच्याकडून मासळीच्या सेवनाबाबत माहिती घेण्यात आली. या संशोधनात सहभागी लोकांनी गेल्या वर्षी तळलेले मासे, भाजलेले मासे किंवा ‘टूना फिश’ खाल्ले होते.

यांना असतो जास्त धोका

संशोधनात वाढलेले वजन, धूम्रपान, मद्यपान, आहार, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास, अतिनील किरणोत्सर्गाचे संपर्क यासारख्या डेटावर परिणाम करणारे घटक विचारात घेतले. निष्कर्षांमध्ये असे आढळून आले की, 1 टक्के लोकांना मेलेनोमाचा धोका वाढला आहे. तर, 0.7 टक्के लोकांना मेलेनोमाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या लोकांमध्ये माशांचे अतिरिक्त सेवन त्वचा कर्करोगाच्या जोखिमशी संबंधित होते.

टुना फिश अधिक घातक

इतर संशोधनात, ज्या लोकांनी तळलेल्या माशाशिवाय शिजवलेले मासे खाल्ले, त्या लोकांमध्ये ‘मेलेनोमा’चा धोका 18 टक्के जास्त आढळला. टुना फिश खाणाऱ्यांमध्ये मेलेनोमाचा धोका 20 टक्के जास्त होता. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तळलेले मासे खाल्लेल्यांमध्ये कॅन्सरचा धोका नव्हता.

काळ्या त्वचेच्या लोकांना कमी धोका

संशोधक लेखक Eunyoung Cho यांच्या मते, मेलेनोमा हा युनायटेड स्टेट्स मधील पाचवा सर्वात सामान्य कर्करोग आहे. आणि मेलेनोमा विकसित होण्याचा धोका गोरी त्वचा असलेल्या 38 लोकांपैकी एक आणि सावळी(काळसर) त्वचा असलेल्या 1,000 लोकांपैकी एक आहे. गेल्या काही दशकांमध्ये माशांचा वापर वाढल्यामुळे आम्ही हे संशोधन केल्याचे त्यांनी सांगीतले. युन्योंग चो पुढे म्हणाले की, इतर अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक मासे खातात त्यांच्या शरीरात पारा आणि आर्सेनिक सारख्या जड धातूंचे प्रमाण जास्त असते. ते त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढवू शकतात. या नवीन संशोधनामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. आम्ही लोकांना मासे खाण्यापासून रोखत नाही, पण संशोधनात जे सिद्ध झाले आहे ते सांगत आहोत. असे त्यांनी ते नमुद केले. याबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें