Fashion Tips : गरोदर असतानाही दिसा फँशनेबल, जाणून घ्या काही टिप्स

गरोदरपणात शरीरातील हार्मोन्स बदलतात. यामुळे महिलांमध्ये खूप बदल दिसतो. यामुळे बहुतेक वेळा महिला एकदम मोकळे कपडे घालतात. या काळात नेहमीची फँशन सांभाळणे महिलांना जमत नाही. आमच्या या काही फँशन टिप्स मात्र तुम्हाला गरोदरपणातही तुमचा फँशन स्टेटस जसाच्या तसा ठेवण्यासाठी मदत करतील.

Fashion Tips : गरोदर असतानाही दिसा फँशनेबल, जाणून घ्या काही टिप्स
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:33 PM

मुंबई : गरोदरपणात शरीरात खूप प्रकारचे बदल होतात. त्यामुळे गरोदर(Pregnant) महिलेला जरा ढिल्ले, मोकळे किंवा आपल्या सोईचे असतील असे कपडे वापरण्याचे सांगितले जाते. पण या भानगडीत महिलांच्या फँशन स्टाईल(Fashion Style)कडे दुर्लक्ष होते. शिवाय कुणाचे वजन वाढते, आधी शरीरावर सूज असते. थोडक्यात काय तर या दिवसात तुमची नेहमीची फिगर राहत नाही. यामुळे एरवी कपड्यांबाबत चोखंदळ महिला कायम टेन्शनमध्ये असतात. अशावेळी आम्ही दिलेल्या टिप्स नक्की वाचा. या काळात आईपणाचा आनंद आणि फँशन सांभाळता येईल इतकी मदत आमच्या या टिप्स तुम्हाला नक्कीच करतील. या टिप्सच्या मदतीने तुम्ही स्मार्ट दिसाल याची खात्री बाळगा.

कार्गो देईल स्पोर्टी लूक

होय गरोदरपणात तुम्ही जीन्स घालू शकत नाही. त्यामुळे कार्गो जीन्सला चांगला पर्याय आहे. कार्गोमुळे तुम्हाला स्पोर्टी लूक मिळेल. कार्गोसोबतच तुम्ही हलकाफुलका टिशर्ट घालू शकता. फक्त कार्गो घेताना तुमच्या नेहमीच्या साईजपेक्षा एक नंबर पुढचा साईज घ्या. जेणेकरून तुमच्या ओटीपोटावर ताण येणार नाही.

मॉर्डन लूकसाठी अंब्रेला फ्रॉक घ्या

अलिकडे अंब्रेला फ्रॉकचा ट्रेंड पुन्हा वापस आला आहे. फोटो शूटसाठी अंब्रेला फ्रॉकला महिलांची खूप पसंती मिळते. यासोबत मँचिंग ज्वेलरी जरूर घाला. पहा हा फँशन ट्रेंड सुद्धा मॉडर्न लूक देतो.

जेव्हा फॉर्मल स्टाईल हवी

जर तुमचा बेबी बंप आता दिसू लागला असेल म्हणजे आता पोट मोठे दिसू लागले असेल तेव्हा साहजिकच स्वतःलाही अजून बदल करावासा वाटतो. स्वतःला फॉर्मल ट्रेंडचे कपडे घालावेसे वाटतात. अशावेळी इलेस्टिक नसलेल्या पेरेला ट्राऊझर घाला. यासोबतच लॉंग शर्ट अजून छान दिसतो. पेरेला ट्राऊझरसोबत फ्लँट सँडल छान दिसतात. हा लूक एकदम शोभून दिसतो.

प्लाझो विथ श्रगचा ट्रेंड जोमात

या काळात प्लाझो सुद्धा खूप आरामदायी आणि मोकळा वाटतो. प्लाझोचा ट्रेंड महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. प्लाझोसोबत अँकल लेंथ श्रग एकदम छान आणि स्मार्ट पर्याय आहे.

कॉटन साडी देईल डिसेंट लूक

जर गरोदरपणातही तुमचे वजन फार वाढले नसेल तर कॉटन साडी सुद्धा छान पर्याय आहे. कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही ही साडी नेसू शकता. ही साडी खूप सुंदर तर दिसतेच शिवाय तुम्हालाहा आरामदायक वाटते. कॉटनची साडी नको असेल तर तुम्ही सिल्कची साडी नेसू शकता. साडीचा पदर मोकळा ठेवाल तर पुढे आलेले पोट तितके चटकन दिसणार नाही.

इतर बातम्या

बहुगुणी कडूलिंब त्वचेपासून ते केसांच्या समस्येवर उपयुक्त…जाणून घ्या कडूनिंबाची महती

सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.