बहुगुणी कडूलिंब त्वचेपासून ते केसांच्या समस्येवर उपयुक्त…जाणून घ्या कडूनिंबाची महती

अँन्टी-इंफ्लेमेटेरी, अँन्टीबायोटिक आणि अँन्टी फंगल असा बहुगुणी कडुनिंब त्वचा आणि केसांच्या संबंधित समस्या दूर करतो. बहुगुणी कडुनिंबाचे महत्त्व जाणून घ्या.

बहुगुणी कडूलिंब त्वचेपासून ते केसांच्या समस्येवर उपयुक्त...जाणून घ्या कडूनिंबाची महती
neem benefits
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:21 PM

मुंबईः हिवाळ्यात तुमचे जरा दुर्लक्ष झाले की त्वचा, केसांचे खूप नुकसान होते. या ऋतूतील हवेने त्वचा (Skin) आणि केस (Hair) रूक्ष होतात. थंडी असल्याने गरम पाण्याने आंघोळ आणि गरम पाण्याने डोक्यावरची त्वचा कोरडी होते. सोबतच केसात कोंडा होतो. जर तुम्हालाही अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल तर कडुनिंब (Neem) खूप उपयुक्त ठरतो. कडुनिंबामध्ये अँन्टी-इंफ्लेमेटेरी,अँन्टीबायोटिक आणि अँन्टीअॉक्सिडंन्ट गुणांनी युक्त कडुनिंब केस आणि त्वचा उजळवण्याच्य क्षमता असतात. कडुनिंबाच्या पानांचा उपयोग करताना कडुनिंबाचे तेल आणि पाणी वापरू शकता. कडुनिंबाचे फायदे :

केस मजबूत करतात

कडुनिंबामध्ये ई- जीवनसत्त्व, कैरोटीनॉयड, लिनोलिक अँसिड, ओलिक अँसिड, स्टीयरिक अँसिड आणि पामिटिक अँसिड असे गुण असतात. यामुळे केस मजबूत होतात. जर तुमचे केस गळत असतील. विरळ होत असतील तर कडुनिंब नक्की वापरा. तुम्हाला हवे असेल तर कडुनिंबाच्या पाण्याने डोक धुवा. यामुळे नक्कीच फरक पडतो.

कोंड्याची समस्या दूर करतो

हिवाळ्यात केसात कोंडा होणे ही अगदी सर्वसामान्य समस्या आहे. कडुनिंबाच्या पाण्यात असलेल्या अँन्टी फंगल गुणाने कोंडा दूर होण्यास मदत होते. यामुळे डोक्याशी निगडित समस्या जसे सूज येणे, खाज, जळजळ,फंगल इन्फेक्शनपासून बचाव होतो. पण कडुनिंबाचे तेल दुसऱ्या तेलात मिक्स करून वापरा.

ब्लँकहेडस आणि व्हाइटहेडस

मुली आपल्या सौंदर्याप्रती खूप जागरूक असतात. ब्लँकहेडस- व्हाईटहेडसची समस्या दूर व्हावी म्हणून ब्यूटी पार्लरमध्ये जावून ट्रीटमेंट करतात. तुम्हाला हवे असेल तर कडुनिंबाची पान ही समस्या दूर करू शकता. कडुनिंबाची पान वाळवून त्याची पावडर करा. या पावडरमध्ये मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची ब्लँकहेडस आणि व्हाईटहेडसची समस्या दूर करतात. शिवाय हा उपाय तुमचे सौंदर्य खुलवतो.

त्वचेच्या समस्येपासून सुटका

कडुनिंबामध्ये असलेल्या विशिष्ट गुणांनी शरीरावर जमा असलेले बँक्टेरियापासून वाचवतो. कडुनिंबाच्या पाण्याने त्वचेवरील रँशेस, खाज, इरिटेशन,फुटकळ्या अशा समस्यांपासून सुटका होते. कडुनिंबाचे पान वाटून घेऊन तोंड आल्यानंतर लावता येतात.

संबंधित बातम्या

सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा

सर्व प्रकारचे चहा ट्राय केलेत… आता असा बनवा लवंग चहा, वजनही येईल नियंत्रणात

Travel Special|स्वर्गाहून सुंदर, जगातील सर्वात उंच शिवमंदिर, उत्तरांचलच्या कुशीत वसलेले चोपता हिलस्टेशन

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.