AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बनारसी साड्यांचे एकूण किती प्रकार आहेत? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी…

बनारसी साडी ही भारतीय संस्कृती आणि परंपरेची ओळख आहे. ही साडी बनवण्यासाठी सिल्क, जरी आणि अनेक प्रकारच्या डिझाईन्स बनवल्या जातात. तर या साड्यांमध्येही अनेक प्रकार आहेत. चला तर मग आजच्या या लेखात आपण बनारस साडीचे प्रकार आणि खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात...

बनारसी साड्यांचे एकूण किती प्रकार आहेत? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी...
Types Of Banarasee SareeImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jul 07, 2025 | 3:32 AM
Share

बनारसी साड्या नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. लग्न, समारंभ किंवा कोणत्याही खास प्रसंगी परिधान करण्यासाठी या साड्या परिपूर्ण आहेत. कारण यासाड्या कार्यक्रमात तसेच आपल्याला एक उत्कृष्ट आणि शाही लूक देतात. तुम्ही पाहिलच असेल की अगदी अभिनेत्रींनाही बनारसी साड्या परिधान करायला खूप आवडतात. अनुष्का शर्मापासून ते दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनकरिता बनारसी साड्या परिधान केल्या होत्या.

बनारसी साडी ही प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार निवडतात. बनारसी साडीचे एकच नाही तर अनेक प्रकार आहेत. त्याबद्दल खूप कमी महिलांना माहिती आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया की बनारसी साड्यांचे किती प्रकार आहेत आणि ती खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

बनारसी साड्यांचे किती प्रकार आहेत?

कटन बनारसी साडी

कटन बनारसी साडी पूर्णपणे रेशमापासून बनवली जाते आणि या साडीचे विणकाम खूप बारीक असते. यामध्ये रेशमी धागे कातलेल्या स्वरूपात वापरले जातात, ज्यामुळे कापड मजबूत आणि चमकदार दिसते. कटन बनारसी साडी खूप हलकी आणि मऊ असते. तर या साडीत पारंपारिक बुटीज आणि फुलांच्या पानांच्या डिझाइनसह अधिक सुरेख बनवली जाते. त्यामुळे जरी बॉर्डर असलेली ही साडी छान दिसते.

ऑर्गन्झा किंवा टिश्यू बनारसी साडी

ऑर्गेन्झा किंवा टिश्यू बनारसी साडी ही पारदर्शक रेशमी कापडापासून बनवली जाते, ज्यामध्ये जर आणि रेशमी कापड वापरले जाते. ज्यामुळे ही साडी खूप हलकी आणि चमकदार दिसते. त्यामुळे ही साडी परिधान केल्यावर आरामदायी व रॉयल लूक दिसतो. तसेच या साडीवरील फुले आणि पानांचे भरतकाम करताना यात सोनेरी-चांदीची जरीचा वापर केला जातो. या प्रकारची साडी पार्टी आणि रिसेप्शनसाठी परिधान करणे योग्य वाटते.

शत्तीर बनारसी साडी

ही बनारसमध्ये बनवलेली एक खास साडी आहे. तर रेशीम आणि कापसाच्या धाग्यांपासून साडी बनवली जाते. ज्यामुळे ती इतर बनारसी साड्यांपेक्षा वेगळी दिसते. या साडीमध्ये पारंपारिक पैस्ली मोटिफ आणि फुलांचे पॅटर्न देखील असतात. याशिवाय या साड्या अनेक डिझाइनमध्ये बनवल्या जातात. तर ही शत्तीर बनारस साडी तिच्या ब्रोकेड वर्क आणि आलिशान सिल्कसाठी ओळखली जाते.

जामदानी बनारसी साडी

जामदानी ही मुळ बंगालची कला आहे जी बनारसी विणकरांनी त्यांच्या स्वतःच्या शैलीत रूपांतरित केली आहे. ही एकतर्फी हातमाग टेकनिक आहे ज्यामध्ये विणकाम करताना डिझाइन कापडात विणले जाते. जामदानी बनारसी साडी परिधान केल्याने एक शाही आणि क्लासी लूक मिळतो.

प्युअर सिल्क बनारसी साडी

ही बनारसी साडीची सर्वात क्लासिक आणि मूळ शैली आहे. तिला कटन सिल्क असेही म्हणतात. तर या साड्या बऱ्याचदा ब्राइडल कलेक्शनमध्ये दिसते. शुद्ध सिल्क आणि जरीपासून बनलेली या साडीची गुणवत्ता सर्वोत्तम आहे आणि किंमतही त्यानुसार जास्त असते.

गोल्डन आणि सिल्व्हर जरी बनारसी साडी

या प्रकारची बनारसी साडी बनवण्यासाठी शुद्ध सोने आणि चांदीच्या जरी वापरल्या जातात. पूर्वीच्या साड्यांमध्ये शुद्ध धागे वापरले जात होते. तर या साड्या परिधान केल्याने एक शाही लूक मिळतो आणि ही साडी बनवण्यासाठी शुद्ध सोने आणि चांदीची जरी वापरली जात असल्याने खूप महाग असते. आता ती अनेक ठिकाणी सिंथेटिक केली गेली आहे, ज्यामुळे त्याची किंमत कमी होते.

बनारसी साडी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

आजकाल बाजारात तुम्हाला अनेक प्रकारच्या बनारसी साड्या मिळतील. बनारसी साडी खरेदी करताना तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. खऱ्या जरीचा वर्क असलेल्या धाग्यांचा रंग आणि चमक वेगळी असते. खूप हलकी आणि सिंथेटिक दिसणारी साडी खरेदी करू नका. साडीच्या बॉर्डर आणि पल्लीवरील बारीक काम बघा. गुळगुळीत फिनिशऐवजी खऱ्या साडीत धाग्यांचा विणकाम नीठ पाहा. यासाठी चांगल्या दुकानातून बनारसी साड्या खरेदी करा. जेणेकरून फसगत होणार नाही.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.