AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fatty liver tips: काहीही खाल्यानंतर तुम्हाला शौचास होत असेल तर तुम्ही काळजा घ्या; गंभीर आजार होऊ शकतात

लिवर म्हणजेच यकृताची समस्या निर्माण झाली तर अशा रुग्णांनी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. आणि जर कुणाला फॅटी लिवरचा त्रास होत असेल तर अशा रुग्णांनी दिवसांतून अडीच ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे असते.

Fatty liver tips: काहीही खाल्यानंतर तुम्हाला शौचास होत असेल तर तुम्ही काळजा घ्या; गंभीर आजार होऊ शकतात
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 7:08 PM
Share

Fatty liver tips: तुमच्या शरीर जर जर मोठे होत असेल तर तुमच्या फॅटी लिवर (Fatty liver) म्हणजेच चरबीयुक्त यकृतामुळे तुमच्या पोटाच्या समस्या वाढणाऱ्या असतात. कधी कधी तर काही लोकं जेवल्यानंतर लगेच शौच्छास जातात, ही खरं तर तुमच्या पोटाची समस्या असते आणि त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. आपल्या शरीरात असणारे लिवर म्हणजेच यकृत (liver) हा असा अवयव आहे, त्याच्याबाबत काही समस्या येत असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या नाही तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे डॉक्टरही अनेकदा तुम्हाला हाच सल्ला देतात की, यकृताच्या समस्येकडे दुर्लक्ष करु नका. सध्याच्या काळात खराब लाईफस्टाईल ( Lifestyle ) आणि चुकीच्या पद्धतीने खाणे पिण्यामुळे अनेक लोकांना वजन वाढण्यासारख्या समस्या उद्भभवू लागल्या आहेत.

तुमचे शरीराचे वजन वाढले असेल, स्थूलपणा येत असेल फॅटी लिवर म्हणजेच तुमच्या यकृतावर चरबी वाढू लागलेली असते. चरबीयुक्त यकृतामुळे तुमच्या पोटाच्या समस्या वाढणाऱ्या असतात. काही लोकं ही खाल्ल्या खाल्ल्या ती शौच्छास जात असता. तुमच्या शरीरातील लिवरची समस्या वाढत असेल तर सगळ्यात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तरीही काही घरगुती उपाय आहेत जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे तुम्हाला जर लिवरची समस्या असेल तर तात्पुरता आराम मिळू शकतो.

खाण्यापिण्याच्या सवयी बदला

जी लोकांना कधीही आणि केव्हाही खाण्यापिण्याची सवयी असतात, त्यांना यकृताला चरबी वाढण्याची समस्या निर्माण झालेली असते. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर जेवणाची सवय लावून घेतली पाहिजे. दिवसातून एकदाच जास्त खाण्यापेक्षा दिवसभरात चार ते पाच वेळा थोडं थोडं खाण्याची सवय लानून घ्या. त्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वं मिळू शकतात.

हिरव्या पालेभाज्या खाण्याची सवय

तुम्हाल जर हिरव्या भाज्या खाण्याची सवय असेल तर तुमच्या यकृताच्या समस्येबरोबरच शरीराच्या इतर समस्यांचंही निवारण होऊ शकते. हिरव्या भाज्यांमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स अशा पोषक तत्वांचा त्यामध्ये समावेश असतो. कोबी, पालक अशा भाज्यांचे तुमच्या आहारात समावेश असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे या भाज्या दिवसातून एकदा तरी खाऊन घ्या. या भाज्यांबरोबरच गाजर आणि टोमॅटो यांचाही समावेश आहारात करा.

लसूण

तुमच्या आहारातून जर लसूणचा जर वापर करत असाल तर शरीरातील एन्झाइम नावाचा द्रव सक्रिय होतो. त्यामुळे शरीरातील विषजन्य पदार्थांना ते बाहेर फेकून देते. त्यामुळे लसूणचा जर आहारात वापर करत असाल तर तुमच्या लिवरसाठी त्याचा फायदाच असतो.

जास्तीत जास्त पाणी प्या

शरीरातील कोणत्याही समस्येवर एक रामबाण उपाय म्हणजे पाणी. कुणाला जर लिवर म्हणजेच यकृताची समस्या निर्माण झाली तर अशा रुग्णांनी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. आणि जर कुणाला फॅटी लिवरचा त्रास होत असेल तर अशा रुग्णांनी दिवसांतून अडीच ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे असते.

घरगुती उपाय करुन बघा

फॅटी लिवर म्हणजे चरबीयुक्त यकृतावर काही जण घरगुती उपायही केले जातात, मात्र जे घरगुती उपाय केले जातात ते खूप कमी जणांना माहिती आहेत. चरबीयुक्त यकृताचा त्रास कमी करायचा असेल तर त्यासाठी आंब्याला आलेल्या मोहराचा वापर केला जातो. आंब्याचा मोहराचा बारीक चूर्ण करुन ठेवा. आणि ते तयार केलेले चूर्ण दिवसांतून 3 ग्रॅम एवढ्या माफाने ते गरम पाण्यातून दिवसातून एकदा घ्या.

संबंधित बातम्या

तुमच्या हातातील मोबाईलने होऊ शकतो घात, जाऊ शकते तुमची नोकरी!

Health Tips: मधुमेह असणाऱ्यांनी काजूचे सेवन करा; तुम्हाला मिळू शकतात हे फायदे

मराठी भाषा दिनावरुन विनोद तावडेंचा शिवसेनेला टोला, तर राऊतांच्या भाषेमुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याची टीका

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.