Health Tips : हायप्रोटीन घेताना ‘या’ चुका चुकून करू नका; नाही तर लठ्ठ व्हाल!

आहारात प्रोटीन हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. प्रोटीन आपल्या शरीरातील स्नायूला वाढविण्यास मदत करतात.

Health Tips : हायप्रोटीन घेताना 'या' चुका चुकून करू नका; नाही तर लठ्ठ व्हाल!
प्रोटीन
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 1:36 PM

मुंबई : आहारात प्रोटीन हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. प्रोटीन आपल्या शरीरातील स्नायूला वाढविण्यास मदत करतात. आहारामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन घेतल्याने आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. यामुळे ओव्हर इन्जेशनची समस्या दूर होते. ज्यामुळे वजन वाढत नाही. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते. आहारात आपण डाळी, अंडी, कडधान्य समाविष्ट करू शकता. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि आपले वजन वेगाने कमी होते. (Follow these tips when taking high protein)

चिकन ब्रेस्ट

जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी चिकन ब्रेस्ट हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. 85 ग्रॅम चिकनमध्ये 20 ग्रॅम प्रोटीन आणि एक ग्रॅम चरबी असते. त्यातील कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. हे खाल्ल्याने तुम्हाला फार काळ भूक लागत नाही. चिकन बनवताना मसाले आणि तेलाऐवजी अधिक भाज्या वापरा. तसेच नेहमीच ताजे चिकन खा. प्रक्रिया केलेले चिकन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.आहारात कार्बचा समावेश करा

कर्बोदकांचा समावेश करा

वाढते वजन कमी करण्यासाठी, आहारात प्रोटीनचे प्रमाण जास्त असले पाहिजे. परंतु प्रोटीनचा अर्थ असा नाही की आपण फारच कमी कार्बोहायड्रेट खावे. कारण कर्बोदके खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. आपण आपल्या आहारात साखरेऐवजी निरोगी कार्बचे सेवन केले पाहिजे. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. कर्बोदकांमध्ये पुरेसे फायबर न घेतल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते.

वर्कआउट

वजन कमी करण्यासाठी जर आपण आहारात प्रोटीन घेत असतोल तर आपण व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. आहारात आपण भरपूर प्रोटीन घेतो आणि व्यायामच करत नसतोल तर आपले वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे दररोज व्यायाम हा केला पाहिजे.

शेंगदाणे

शेंगदाणा हा प्रोटीनचा उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत. विशेष म्हणजे शेंगदाणे बाजारात सहज उपलब्ध असतात. 100 ग्रॅम शेंगदाणे शरीराला 26 ग्रॅम प्रोटीन देऊ शकतात. 1 किलो शेंगदाण्याची किंमत 80 ते 100 रुपये असल्याने, दिवसाला केवळ 10 रुपयांत तुम्हाला नैसर्गिक प्रोटीन मिळू शकते.

सोयाबीन

सोयाबीन या शाकाहारी घटकात भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात. 100 सोयाबीनमुळे शरीराला जवळपास 50 ग्रॅम प्रोटीन मिळते. शिवाय बजेटमध्ये असल्याने खिशालाही कात्री लागत नाही.

काळे चणे

काळे चणेदेखील प्रोटीनचा उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे. काळ्या चाण्यांना ‘बंगाल ग्राम’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. 100 ग्रॅम चाण्यांमध्ये 19 ग्रॅम प्रोटीन असते. शिवाय हा घटक आपल्या नेहमीच्या जेवणात देखील समाविष्ट असतो.

डाळी

डाळी, शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन बनविण्याचा एक चांगला स्रोत आहे, जे शिजविणे सोपे आणि स्वादिष्ट आहे. वेगवेगळ्या डाळी आपण आहारात घेतल्या पाहिजेत. मूग आणि हरभरा डाळीमध्ये पोषक घटक आणि प्रोटीन असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. एक कप डाळीत 18 ग्रॅम प्रोटीन आणि 16 ग्रॅम फायबर असते. यामुळे आपले पोट बऱ्याच काळ भरल्यासारखे वाटते आणि बद्धकोष्ठतेची समस्या यामुळे दूर होते.

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Follow these tips when taking high protein)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.