फाउंडेशन आधी की कंसीलर? परफेक्ट मेकअपसाठी जाणून घ्या योग्य क्रम
परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कंसीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ, ग्लोइंग आणि फ्लॉलेस दिसण्यासाठी योग्य मेकअप टेक्निक जाणून घेणं आवश्यक आहे. चला, जाणून घेऊया यासाठी सर्वात प्रभावी उपाय.

तुमचं मेकअप कितीही महागड्या प्रोडक्ट्सने केलं असलं, तरी योग्य क्रमाने ते लावणं खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः मेकअप बेस तयार करताना एक प्रश्न अनेक महिलांच्या मनात येतो आधी फाउंडेशन लावायचं की कंसीलर? हा छोटासा निर्णय तुमचं लुक एकदम ग्लॅमरस करू शकतो किंवा सगळं मेकअप खराब करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया मेकअप एक्सपर्ट्स काय सांगतात आणि फ्लॉलेस लुकसाठी काय आहे बेस्ट टेक्निक.
काय कराल ?
मेकअप आर्टिस्ट्स आणि ब्यूटी साइट्सप्रमाणे, सर्वात आधी फाउंडेशन लावणं योग्य असतं. फाउंडेशन स्किनचा टोन इवन करतो आणि एक स्मूद बेस तयार करतो. फाउंडेशन लावल्यावर तुमचे डाग-धब्बे, डार्क सर्कल्स यांपैकी बरेचसे आधीच हलके दिसायला लागतात. त्यानंतर जिथे अजून कव्हरेज हवी, तिथे कंसीलरने टच-अप करायला सोपं जातं. यामुळे मेकअप नॅचरल आणि लाइट वाटतो.
आधी कंसीलर लावणं चुकीचं का?
जर तुम्ही आधी कंसीलर लावलात आणि नंतर फाउंडेशन दिलं, तर कंसीलर हलका होतो किंवा पसरतो. त्यामुळे डार्क सर्कल्स, स्पॉट्स आणि पिग्मेंटेशन नीट कव्हर होत नाहीत. कंसीलरला टार्गेटेड पद्धतीने लावणं महत्त्वाचं असतं, म्हणून तो शेवटी लावणं जास्त चांगलं.
तुमच्या स्किन टाइपनुसार वापरा ही ट्रिक
ड्राय स्किनसाठी: आधी हायड्रेटिंग प्रायमर, मग फाउंडेशन आणि शेवटी कंसीलर वापरा.
ऑयली स्किनसाठी: मॅट फाउंडेशन आणि मॅट कंसीलरचा वापर करा.
मिक्स्ड स्किनसाठी: आधी बेस टोन एकसारखा करण्यासाठी फाउंडेशन लावा.
योग्य कंसीलर कसा निवडाल?
डार्क सर्कल्ससाठी – पिंक किंवा पीच अंडरटोन असलेला कंसीलर.
स्पॉट्ससाठी – येलो अंडरटोन कंसीलर.
रेडनेससाठी – ग्रीन बेस कंसीलर.
लिक्विड प्रोडक्ट्स कसे लावायचे?
लिक्विड फाउंडेशन आणि कंसीलर साठी डॅम्प ब्यूटी ब्लेंडर वापरावा. याने प्रोडक्ट स्किनमध्ये नीट ब्लेंड होतं आणि चेहरा केकी लागत नाही. आधी फाउंडेशन लावा, मग हलक्याच हाताने कंसीलर डॉट करा आणि ब्लेंड करा.
सेटिंग पावडर आणि स्प्रे
फाउंडेशन आणि कंसीलर नीट सेट झाल्यावर ट्रान्सलूसेंट पावडरने बेस लॉक करा. त्यानंतर सेटिंग स्प्रेचा वापर करा, जेणेकरून मेकअप दीर्घकाळ टिकतो.
ब्युटी एक्सपर्ट्स आणि अनेक संशोधनांचं मत असं आहे की, मेकअप करताना आधी फाउंडेशन आणि मग कंसीलर लावणं हाच सर्वोत्तम क्रम आहे. ही आयडीया मेकअप हलकं ठेवते, फ्लॉलेस फिनिश देते आणि नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवतं. त्यामुळे पुढच्या वेळी मेकअप करताना हे सिक्रेट नक्की लक्षात ठेवा आधी फाउंडेशन, मग कंसीलर.
