Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीमध्ये पूर्ण होतील सर्व मनोकामना, पण चुकूनही करू नका ‘ही’ कामे!

Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीमध्ये पूर्ण होतील सर्व मनोकामना, पण चुकूनही करू नका ‘ही’ कामे!
गुप्त नवरात्री

दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात गुप्त नवरात्री (Gupt Navratri 2021) सुरु होते. चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणेच गुप्त नवरात्री वर्षात दोन वेळा येते.

Harshada Bhirvandekar

| Edited By: अनिश बेंद्रे

Feb 20, 2021 | 11:16 AM

मुंबई : दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात गुप्त नवरात्री (Gupt Navratri 2021) सुरु होते. चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणेच गुप्त नवरात्री वर्षात दोन वेळा येते. पहिली माघ महिन्यात येते आणि दुसरी आषाढ महिन्यात येते. माघ महिन्याची गुप्त नवरात्री यंदा 12 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये गुप्त रुपाने पूजा पाठ केला जातो. असे म्हणतात की. या कालावधीत ‘गुप्त’ रूपाने पूजापाठ केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात (Gupt Navratri 2021 special do not do theses thing in gupt navratri).

गुप्त नवरात्री दरम्यान करा ‘ही’ कामे :

– गुप्त नवरात्रीत देवी लक्ष्मीची पूजा करताना, तिला कमळाचे फूल अर्पण केले पाहिजे. आपल्याकडे कमळाचे फूल नसल्यास, आपण कमळाच्या फुलाचे चित्र देखील ठेवू शकता. आई लक्ष्मी यावरसुद्धा प्रसन्न होते.

– जर तुम्ही गुप्त नवरात्रीत सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरी आणले, तर देवी लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. हे नाणे आपल्या घरात संपत्ती, आनंद आणि समृद्धी आणते.

– या नवरात्री दरम्यान, माता दुर्गेला लाल फुलं अर्पण करावीत. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, तर ते बरे होतील. त्याचबरोबर ‘ऊं क्रीं कालिकायै नम:’ या मंत्राचा जप देखील करावा. त्या व्यक्तीला मतेचा आशीर्वाद मिळतो.

– या दरम्यान कर्जातून मुक्त होण्यासाठी माता दुर्गा समोर अत्तर सह धूप प्रज्वलित करावा. यामुळे कर्जातून मुक्तता मिळते.

– या दिवसांत घरात मोराचे पीस आणणे अतिशय शुभ मानले जाते. मोर हा माता लक्ष्मीचे वाहन आहे. घरी मोराचे पीस आणल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते (Gupt Navratri 2021 special do not do theses thing in gupt navratri).

चुकूनही करू नका ‘ही’ कामे

– पूजेच्या वेळी चामड्याची वस्तू वापरू नका किंवा आपल्या सभोवताल ठेवू नका.

– पूजेच्या वेळी लाल, पिवळे शुभ कपडे घाला, काळे कपडे घालू नका.

– मांस, दारू आणि धुम्रपान टाळा. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करु नका.

– कोणालाही तुच्छ लेखू नका, वाईट बोलू नका.

– कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. कन्येला देवीप्रमाणे मानले जाते.

– यावेळी, केस कापू, दाढी करू नका किंवा आपले नखे देखील कापू नका.

– आपली उपासना पूर्णपणे गुप्त ठेवा.

गुप्त नवरात्रीचं महत्त्व काय?

साधारणपणे गृहस्थ कुटुंबातील लोक गुप्त नवरात्रीचे व्रत ठेवू शकत नाही. ते चैत्र आणि शारदीय नवरात्री मध्ये देवीची उपासना करु शकतात. गुप्त नवरात्री विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठीची नवरात्री असते. यामध्ये भगवती कालीच्या स्वरुपासोबत दहा महाविद्यांची पूजा केली जाते. तांत्रिक विशेष रुपाने या नवरात्रीमध्ये साधना करतात. गुप्त नवरात्रीदरम्यान करण्यात येणारी पूजा, मंत्र, पाठ आणि प्रसाद सर्व काही रहस्य ठेवलं जातं. तरच ही साधना यशस्वी होते. साधनेदरम्यान देवी भगवतीचे भक्त कडक नियमांचं पालन करतात.

(Gupt Navratri 2021 special do not do theses thing in gupt navratri)

हेही वाचा :

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें