AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिमालयन रॉक सॉल्ट’च्या दिव्याची कमाल! ‘या’ रोगांपासून करेल तुमचे संरक्षण…

‘हिमालयन रॉक सॉल्ट’चे दिवे हवेतील धूळ, गंध, बुरशी यांना फिल्टर करतात आणि अॅलर्जी आणि दम्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात.

‘हिमालयन रॉक सॉल्ट’च्या दिव्याची कमाल! ‘या’ रोगांपासून करेल तुमचे संरक्षण...
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 13, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई : हिमालयाच्या खडकांमधून एक विशिष्ट मीठ बाहेर येते, ज्यामध्ये अनेक प्रकारचे खनिजे असतात. याला मिठाला ‘हिमालयन रॉक सॉल्ट’ म्हणतात. हे मीठ आपल्या घरात वापरल्या जाणार्‍या सामान्य मिठापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या मीठाने इलेक्ट्रॉनिक दिवे तयार केले जातात आणि जेव्हा हा दिवा पेटवला जातो तेव्हा त्यातून लाल, गुलाबी आणि पिवळे प्रकाश पडतो (Health benefits of Himalayan rock salt lamp).

या दिव्यातून निघणारा प्रकाश तुमच्या वास्तूवर खोल परिणाम करतो. या दिव्यामुळे घरातील हवेमधील नकारात्मक आयन अयशस्वी होतात. या दिव्यांचा वापर मानसिक आणि शारीरिक फायदे प्रदान करतो, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. आजकाल लोक घरात इंटीरियर करताना ‘हिमालयन रॉक सॉल्ट’च्या मीठाच्या दिव्याला प्राधान्य देतात. हा दिवा आपल्या घरातील प्रदूषण कमी करतो. तसेच, आपल्या सभोवतालची हवा स्वच्छ करण्यात देखील तो उपयुक्त ठरतो.

दम्याचा त्रास रोखण्यासाठी खूप उपयुक्त!

‘हिमालयन रॉक सॉल्ट’चे दिवे हवेतील धूळ, गंध, बुरशी यांना फिल्टर करतात आणि अॅलर्जी आणि दम्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतात. हा दिवा घरात ठेवल्याने दमा, ब्राँकायटिस आणि श्वसन रोग होत नाहीत.

सर्दी-खोकल्यापासून आराम

या दिवेमधून उत्सर्जित होणारे नकारात्मक आयन हवेत उपस्थित असलेले अनेक प्रदूषित घटक नष्ट करतात आणि आपल्या सभोवतालच्या हवेला शुद्ध करतात. यामुळे आपल्या फुफ्फुसातील संक्रमणाचा धोका कमी होतो आणि सर्दी, खोकला, शिंक, घसा खवखवणे आणि अॅलर्जी सारख्या समस्यांपासून बचाव होतो (Health benefits of Himalayan rock salt lamp).

उर्जा पातळी वाढते.

आपल्या घरात वापरल्या गेलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून सकारात्मक आयन बाहेर पडतात, ज्यामुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित अडचणी येऊ लागतात. परंतु या दिव्यामधून उत्सर्जित नकारात्मक आयन, सकारात्मक आयन नष्ट करून आपल्याला रोगांपासून दूर ठेवते. हवेतील नकारात्मक आयनमुळे, मेंदूत ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे आपण नेहमीच सक्रिय वाटते.

चांगली झोप लागते.

तेजस्वी प्रकाशात, झोपेसाठी उपयुक्त हार्मोन मेलाटोनिनचे उत्पादन उशीर होत असते, ज्यामुळे आपल्या झोपेमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. परंतु, या दिव्याच्या मंद प्रकाशात, मेलाटोनिन त्वरीत तयार होते, जे आपल्या चांगल्या झोपेसाठी उपयुक्त ठरते.

(टीप : वरील माहिती केवळ संशोधनावर आधारित आहे.)

(Health benefits of Himalayan rock salt lamp)

हेही वाचा :

Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!