AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीन्स घातल्यानंतर महिलांना काय त्रास होतो?; या समस्यांकडे दुर्लक्ष नकोच

जीन्स फॅशन स्टेटमेंट झाली आहे पण नियमितपणे, विशेषतः घट्ट जीन्स घालणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्वचेच्या संसर्गापासून ते रक्तप्रवाहावर परिणाम आणि प्रजननक्षमतेवर दुष्परिणामपर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. रंगीत जीन्सतील रसायने अॅलर्जीची शक्यता वाढवतात. म्हणूनच, जीन्स घालण्याची वारंवारता कमी करणे आणि शक्यतो सुती कपडे निवडणे श्रेयस्कर आहे.

जीन्स घातल्यानंतर महिलांना काय त्रास होतो?; या समस्यांकडे दुर्लक्ष नकोच
जीन्स घातल्यानंतर महिलांना काय त्रास होतो?; या समस्यांकडे दुर्लक्ष नकोच
| Edited By: | Updated on: Jan 04, 2025 | 3:08 PM
Share

जीन्स घालणं ही आता एक फॅशन झाली आहे. मुलच नव्हे तर मुलींमध्येही जीन्स घालण्याची फॅशन वाढली आहे. कोणत्याही वयातील व्यक्ती असो, प्रत्येकाला जीन्स घालयला आवडते. फॅशनच्या दुनियेत जीन्सला नेहमीच खास स्थान राहिलं आहे. 90 च्या दशकातील बॅगी जीन्सपासून आजच्या रिप्ड जीन्सपर्यंतचा जीन्सचा प्रवास राहिला आहे. पण, जीन्स नियमितपणे घालण्यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल अनेकांना माहिती नाही. कधी माहिती असली तरी त्याची तीव्रता अनेकांना समजलेली नाही. खास करून जीन्स घालणाऱ्या महिलांना कोणता त्रास होऊ शकतो, यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत.

त्वचा

फिट जीन्स म्हणजेच तंग जीन्स. जीन्सचा हा प्रकार आरोग्यासाठी मोठा धोकादायक मानला जातो. टाईट जीन्स बराच वेळ घातल्यामुळे घामाचा गंध थांबून मूत्रमार्गात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. हे फक्त उन्हाळ्यातच नव्हे, तर पावसाळ्यातही होऊ शकते. कारण पावसाळ्यात घाम साचून राहतो आणि त्यामुळं त्वचेच्या इन्फेक्शनची शक्यता वाढते.

रक्तप्रवाहावर परिणाम

टाईट जीन्सचे दीर्घकाळ वापरल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहावरही परिणाम होतो. रक्तप्रवाह कमी होणामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे जर ती नियमितपणे घातली तर ती आपल्या स्नायूंवर दबाव आणते. तसेच, पाय दुखणे आणि विविध समस्या उद्भवू शकतात.

अलर्जी होऊ शकते

कलर डाईंग किंवा डाय केलेली जीन्स वापरणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जीन्सला वेगवेगळे रंग देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांमध्ये अनेक प्रकारच्या साइड इफेक्ट्स होऊ शकतात. यामुळे अॅलर्जी, इन्फेक्शन इत्यादी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

प्रजननक्षमतेवर परिणाम

टाईट कपडे नियमितपणे घातल्यामुळे प्रजननक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे अनेक संशोधनांनी दाखवून दिले आहे. टाईट जीन्स घालणाऱ्या महिलांना वल्वोडायनिया होण्याची शक्यता अधिक असते. या रोगामुळे त्यांच्या गुप्तांगांमध्ये तीव्र वेदना, इन्फेक्शन इत्यादी समस्यांचे समाधान होऊ शकते.

जीन्सच्या ऐवजी नेहमीच शालीन कापडाचे कपडे घालणे उत्तम असते. मात्र, अनेकजण फॅशनला अधिक महत्त्व देतात. म्हणूनच, नियमितपणे जीन्स घालण्याऐवजी आठवड्यात एक किंवा दोन वेळा घालणे चांगले. एक दिवस संपूर्ण दिवस जीन्स घालल्यानंतर त्याला धुण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतरच दुसऱ्या दिवशी ते परत वापरा.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.