AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | शरीरातून सतत घामाचा दुर्गंध येतोय? मग, नक्की ट्राय करा ‘बाभळी’चं उटणं

हिवाळा जसजसा कमी होत आहे, तसतसा घाम आणि शरीर दुर्गंधीचा त्रास वाढू लागला आहे.

Skin Care | शरीरातून सतत घामाचा दुर्गंध येतोय? मग, नक्की ट्राय करा ‘बाभळी’चं उटणं
हिवाळा जसजसा कमी होत आहे, तसतसा घाम आणि शरीर दुर्गंधीचा त्रास वाढू लागला आहे.
| Updated on: Feb 08, 2021 | 6:45 PM
Share

मुंबई : हिवाळा जसजसा कमी होत आहे, तसतसा घाम आणि शरीर दुर्गंधीचा त्रास वाढू लागला आहे. उन्हाळ्यात ही समस्या सर्वात त्रासदायक ठरते. ज्या लोकांना शरीरातून खूपच दुर्गंध येण्याची समस्या आहे, त्यांनी बाभूळाच्या उटण्याचा वापर केल्यास, त्यापासून आराम मिळू शकेल. आपल्या ओळखींमध्ये अशी एखादी व्यक्ती असेल, जी बॉडी ऑडरर्मुळे त्रस्त असेल, तर त्यांना देखील आपण हा उपाय सुचवू शकता. जेणेकरून त्यांना या दुर्गंधीपासून मुक्तता मिळेल आणि कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही (Homemade Babool tree leaves ubtan to prevent body odor).

बऱ्याच लोकांना बाभळाच्या वापरामुळे दात पांढरे आणि मजबूत राहतात, हे माहित असते. मात्र, हिवाळ्यात उबदार कपड्यांमुळे येणाऱ्या खाजेपासून मुक्तता मिळवण्यात देखील बाभूळ उपयुक्त आहे, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. तर, उन्हाळ्याच्या काळात, घामामुळे शरीराला येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येपासून देखील बाभूळ मुक्ती देतो.

काही लोकांना अंडरआर्म्समधून खूप दुर्गंध येण्याची समस्या असते. हे त्यांच्याबरोबर उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यामध्येही होते. आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांना ही समस्या असल्यास आपण बाभळीच्या पानांपासून तयार केलेले उटणे वापरावे. याचा शरीराला फायदा होईल.

बाभळीच्या उटण्याचे फायदे

बाभळीची पाने फारच लहान आणि बारीक असतात. परंतु, या लहान दिसणाऱ्या पानांमधील औषधी गुणधर्मांबद्दल माहिती जाणून घेतल्यास आपल्याला आश्चर्य वाटेल. बाभूळीच्या पानांपासून बनवलेली पेस्ट लावल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल प्रतिबंधित होते. यामुळे शरीरावर दुर्गंधी निर्माण करणारे सूक्ष्मजंतू तयार होत नाहीत. परिणामी दुर्गंधीपासून आराम मिळतो.

हिवाळ्याच्या हंगामात ज्या लोकांना लोकरीच्या कपड्यांमुळे जास्त प्रमाणात खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा त्वचा संबंधित इतर कोणत्याही समस्या आहेत, त्यांनी देखील बाभळीचे उटणे वापरावे. याचा फायदा तुमच्या शरीराला मिळेल. बाभूळचे नैसर्गिक औषधी गुणधर्म आपल्या त्वचेची पीएच पातळी राखतात (Homemade Babool tree leaves ubtan to prevent body odor).

बाभळीचे उटणे कसे तयार करावे?

बाभूळच्या पानांचे उटणे बनवण्यासाठी बाळ हरडा आणि बाभळीची पाने एकत्र करून बारीक वाटून घ्या. याची पेस्ट तयार करण्यासाठी गुलाबाचे पाणी द्रव पदार्थ म्हणून वापरा. याने त्वचेचे चमक वाढते आणि थंडावा मिळतो.

बाळ हरड आयुर्वेदिक औषधे उपलब्ध असलेल्या कुठल्याही दुकानात विकत मिळेल. बाभळीची झाडे सहसा रस्त्याच्या कडेला बरीच असतात. मात्र, जर तुमच्या आजूबाजूला हे झाड नसेल, तर तुम्ही बाभळीची वाळलेली पाने आयुर्वेदिक स्टोअरमधून खरेदी करू शकता. किंवा आपल्या भाजी विक्रेत्याशी बोलून आपण बाभूळ पाने मागवू शकता.

इतका वेळ लावा बाभळीचे उटणे

बाभळीच्या पानांची ही तयार पेस्ट आपण संपूर्ण शरीरावर देखील लावू शकता. ही पेस्ट किमान 15 ते 20 मिनिटे लावा आणि नंतर अंघोळ करा. हा उपाय नियमितपणे केल्याने त्वचेच्या सर्व आजारांपासून आपले संरक्षण होते. तसेच, शरीरातील दुर्गंधी नाहीशी होते.

बाभळीचे हे उटणे सतत 7 दिवस शरीरावर नियमित लावावे. याने तुम्हाला आराम वाटेल. सुरुवातीच्या काळात हा प्रभाव काहीसा हळू असतो. परंतु, हळूहळू सर्व समस्या पूर्णपणे नाहीशा होतात आणि आपली त्वचा सुंदर होते

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Homemade Babool tree leaves ubtan to prevent body odor)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.