Skin Care : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मध आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर!

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या ऋतूमध्ये तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझिंग करणे खूप आवश्यक आहे. कारण बर्‍याच लोकांची त्वचा खूप कोरडी होते. या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण गुलाब पाणी आणि मधाचा वापर करू शकता.

Skin Care : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मध आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 6:00 AM

मुंबई : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या ऋतूमध्ये तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझिंग करणे खूप आवश्यक आहे. कारण बर्‍याच लोकांची त्वचा खूप कोरडी होते. या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण गुलाब पाणी आणि मधाचा वापर करू शकता. हे त्वचेला हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया मध आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक कसा बनवायचा.

मध आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक

मध आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला 1 चमचा मध आणि 1 चमचा गुलाबपाणी लागेल. मध आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका लहान भांड्यात गुलाब पाणी आणि मध घ्या. दोन्ही चांगले मिसळा. त्यानंतर हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेला लावा. 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आठ दिवसातून दोनदा हा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावा.

गुलाब पाणी

गुलाब पाण्यात असलेले अनेक पोषक घटक जसे की जीवनसत्त्वे A, B3, C, E तसेच अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर आहेत. नवीन पेशींच्या वाढीस चालना देण्यासाठी व्हिटॅमिन ए अत्यंत फायदेशीर आहे. गुलाब पाण्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे त्वचेच्या समस्या जसे मुरुमांपासून दूर ठेवतात. गुलाब पाण्यात अँटीऑक्सिडंट असतात जे तुमची त्वचा निरोगी आणि तरुण ठेवतात.

मध

मध हे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक ब्लीच म्हणून ओळखले जाते. त्यात त्वचेचा रंगही हलका करण्याची क्षमता आहे. मधामध्ये कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त इत्यादींसारखी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेच्या पेशींचे पोषण करण्यास, त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.