AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसा निर्माण होतो कालसर्प दोष? जाणून घ्या कारणे आणि उपाय

ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कालसर्प दोष का लागतो? त्याची लक्षणे आणि उपाय काय आहे ते जाणून घेऊ.

कसा निर्माण होतो कालसर्प दोष? जाणून घ्या कारणे आणि उपाय
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: Jitendra Zavar | Updated on: Feb 11, 2025 | 2:02 PM
Share

ज्योतिष शास्त्रानुसार सर्व राशीच्या लोकांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती वेळोवेळी बदलत असते. ज्यामुळे अनेक प्रकारचे योग तयार होतात. यातील काही शुभ तर काही अशुभ मानले जातात. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे कुंडलीतही दोष ही निर्माण होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. या अशुभ योगांपैकी एक म्हणजे कालसर्पदोष जो अत्यंत विनाशकार्य मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्याला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घेऊ कोणत्या गोष्टीमुळे कालसर्प दोष निर्माण होतो. कालसर्प दोषाची लक्षणे काय आहेत आणि ते दूर करण्याचे काही उपाय.

का निर्माण होतो कालसर्प दोष?

ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि केतू हे दोन्ही मायावी ग्रह मानले जातात. जेव्हा सर्व ग्रह कुंडलीत राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा कालसर्प दोष निर्माण होते. राहू आणि केतू हे छायाग्रह मानले जातात आणि त्यांचे परिणाम अनेकदा नकारात्मक असतात. पीडित लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कालसर्प दोष निर्माण होण्याची कारणे?

  • राहू आणि केतू समोरासमोर येतात.
  • सातही ग्रह एका बाजूला किंवा राहू केतूच्या मध्ये येतात.
  • कुंडलीत राहू आणि केतूची स्थिती अशुभ असल्यास.

कालसर्प दोषाची लक्षणे

  • लग्नाला विलंब
  • मुले न होणे किंवा मुलांच्या वाढीस अडथळा निर्माण करणे
  • कौटुंबिक कलह
  • मानसिक ताण
  • योग्य निर्णय घेण्यास असमर्थता
  • नोकरीत समस्या
  • अपघात
  • गंभीर आजार
  • शिक्षणात व्यत्यय

कालसर्प दोष टाळण्यासाठी उपाय

ज्योतिष शास्त्रानुसार कालसर्प दोष असलेल्या लोकांनी दररोज महादेवाची पूजा करावी. यासाठी सोमवारी आणि शनिवारी स्नान आणि धान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून महादेवाला अभिषेक करावा. तसेच सोमवारी आणि शनिवारी काळया तिळाचे दान करावे. त्याचबरोबर कालसर्प दोष दूर करण्यासाठीची पूजा ब्राह्मणाच्या उपस्थितीत करावी. याशिवाय दररोज दोनदा हनुमान चालीसाचे पठण करावे. त्याचबरोबर कालसर्प दोष निवारण यंत्राची पूजा करावी.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...