रामदेव बाबांनी मधुमेहावर सांगितला रामबाण उपाय, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर
भारतात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतातील प्रत्येक घरात किमान एक तरी मधुमेहाचा रुग्ण आढळतो. पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी मधुमेहावर रामबाण उपाय सांगितला आहे.

भारतात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी असेही म्हटले जाते. भारतातील प्रत्येक घरात किमान एक तरी मधुमेहाचा रुग्ण आढळतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे हा आजार अनुवंशिक आहे. जर एखाद्या घरात मधुमेहाचा रूग्ण असेल तर पुढच्या पिढीलाही मधुमेहाचा त्रास जाणवतो. याला मधुमेह 1 म्हणतात. तर खराब खाद्य आणि लठ्ठपणा या मुळे मधुमेह 2 होऊ शकतो.
मधुमेह हा असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र तो नियंत्रणात ठेवता येतो. यासाठी योग्य आहार आणि औषधे घेणे गरजेचे आहे. पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मधुमेह या आजारावर नियंत्रण कसे ठेवायचे याबाबत माहिती दिली आहे.
जांभूळ आणि त्याच्या बिया
योगगुरू रामदेव बाबा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये जाभूळ आणि त्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशर असल्याचे म्हटले आहे. जांभूळ हे पचनासाठी चांगले असते, तसेच ते या स्वादुपिंडाच्या बीटा पेशी सक्रिय करण्यास मदत करते. ज्यामुळे इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
View this post on Instagram
सेवन कसे करायचे?
रामदेव बाबा यांनी म्हटले की, मधुमेहाचे रुग्ण जाभूळ थेट खाऊ शकतात. याचा फायदा होतो, मात्र जांभळाच्या बिया जास्त फायदेशीर असतात. या बियांची पावडर बनवून ती खाल्यास आरोग्याला फायदा होतो. यासाठी जांभळाच्या बिया चांगल्या प्रकारे धुवा. त्यानंतर त्या उन्हात वाळवा. त्यानंतर एक कारले घ्या आणि त्याचे लहान तुकडे करू तेही उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. बिया आणि कारले वाळवल्यानंतर, काळे जिरे, चिरईता आणि कुटकी चांगले वाळवा. या सर्व गोष्टी एकत्र करुन बारीक करा आणि पावडर बववा.
या पावडरच्या सेवनामुळे स्वादुपिंड सक्रिय होते. तसेच आहारात काही बदल करून आणि दररोज व्यायाम करून मधुमेह नियंत्रित करता येतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारल्याचा आणि आवळ्याचा रस देखील फायदेशीर असतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतरही घरगुती उपाय आहेत. मात्र कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी, तुम्ही तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
