आंबे खरेदी करताय? या टिप्स करा फॉलो, ओळखा कृत्रिम आणि नैसर्गिक आंब्यांमधील फरक

आजकाल कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. शेवटी कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा हा मोठा प्रश्न आहे. पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला योग्य आंबा ओळखण्यास मदत होईल.

आंबे खरेदी करताय? या टिप्स करा फॉलो, ओळखा कृत्रिम आणि नैसर्गिक आंब्यांमधील फरक
mango season
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 3:41 PM

मुंबई: उन्हाळा म्हणजे आंबा खाण्याचा आनंद घेणे. आंब्याची आवड नसलेला क्वचितच कोणी असेल. मात्र आजकाल कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. शेवटी कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा हा मोठा प्रश्न आहे. पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला योग्य आंबा ओळखण्यास मदत होईल. फळे पिकविण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी रसायने किंवा इतर पद्धती वापरल्या जातात. हे बरेचदा मागणी पूर्ण करण्यासाठी किंवा फळांचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी केले जाते. या प्रक्रियेत वापरली जाणारी अनेक रसायने हानिकारक असू शकतात आणि दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

  1. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग एकसमान असतो आणि नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यापेक्षा जास्त पिवळा किंवा केशरी दिसू शकतो. पिकण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे त्यांचे थोडे चमकदार स्वरूप देखील असू शकते.
  2. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला गोड, फळांसारखा वास असतो, तर कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याला रसायने किंवा वेगळा वास असू शकतो. जर आंब्याला विचित्र किंवा खराब वास आला असेल तर तो कृत्रिमरित्या पिकविलेला आंबा असू शकतो.
  3. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यापेक्षा अधिक मऊ वाटू शकतात. कारण पिकण्याच्या प्रक्रियेत वापरली जाणारी रसायने फळांमधील पेशींची भिंत तोडून त्यांना मऊ बनवू शकतात.
  4. रसायनांच्या वापरामुळे कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचे बाह्य नुकसान होऊ शकते – जसे की स्क्रॅच किंवा डाग. नैसर्गिक आंब्यात या प्रकारचा बाह्य दोष असण्याची शक्यता कमी असते.
  5. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याच्या गोड आणि चवदार चवीच्या तुलनेत कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याची चव सौम्य किंवा विचित्र असू शकते. जर आंब्याची चव खराब असेल तर तो कृत्रिमरित्या पिकवलेला असू शकतो.

आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आंबे खरेदी कराल तेव्हा या टिप्स चा वापर करून तुम्ही खऱ्या अर्थाने नैसर्गिक आंबे खरेदी करू शकाल याची खात्री करून घ्या.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.