AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुद्ध रक्तासाठी ही चटणी आहे खूपच फायद्याची, जाणून घ्या संपूर्ण रेसीपी

हिवाळ्यात हिरव्या ताज्या पालेभाज्या बाजारात येत असतात. कोथिंबिरीच्या पानापासून आंबट-मसालेदार चटणी बनवून जेवणाची चव वाढवता येते, त्याच बरोबर या चटणीच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक फायदे देखील होतात.

शुद्ध रक्तासाठी ही चटणी आहे खूपच फायद्याची, जाणून घ्या संपूर्ण रेसीपी
food
| Edited By: | Updated on: Dec 15, 2024 | 8:50 PM
Share

थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. त्यात हंगामी भाज्यांचे या दिवसात आहारात समावेश करून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण हंगामी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने कोणतेही आजारांचा संसर्ग होत नाही. यासाठी तुमच्या आहारात कोथिंबिरपासून बनवलेल्या चटणीचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे तुमच्या रक्तातील घाण काढून टाकण्यास देखील खूप उपयुक्त ठरते. कोथिंबिरीपासून आंबट-मसालेदार चटणी बनवून तुमच्या जेवणाची देखील चव वाढवता येते तर मग जाणून घेऊया चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

कोथिंबीर – बारीक चिरलेली

लसूण – ४-५ पाकळ्या

आलं – १ इंच तुकडा

हिरव्या मिरच्या – ३ ते ४

शेंगदाणे – १ वाटी

लिंबाचा रस- अर्धी वाटी (४ चमचे)

मीठ- आवश्यकतेनुसार

कृती

चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाजारातून ताजी कोथिंबिरी आणून ते नीट धुवून कापून घ्यावेत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लिंबाचा रस आणि थोडे मीठ घालून बारीक वाटून घ्या. यानंतर कोथिंबिरीची चटणी तयार होईल. ही चटणी तुम्ही पोळी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता.

कोथिंबिरीच्या चटणीचा सुगंध आणि चव दोन्ही अतुलनीय आहेत. ही चटणी तुम्ही तळलेले पदार्थ, भात किंवा पोळीबरोबर खाऊ शकता. कोथिंबिरीची पाने केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही असतात. तज्ज्ञांच्या मते, कोथिंबिरीमध्ये असे घटक असतात जे रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. तसेच या चटणीच्या सेवनाने जेवणाची टेस्ट तर वाढेलच, सोबतच शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतील. यूरिक अ‍ॅसिडची समस्या असणाऱ्या लोकांनी ही चटणी रोज चपाती किंवा पराठ्यांसोबत सेवन करावी. या चटणीने यूरिक अ‍ॅसिडमुळे वाढलेली हात-पायांवरील सूजही कमी होते.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.