AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाक घरातील दगदग कमी कशी करायची; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

काउंटरवर केवळ पहिल्या टप्प्यासाठी इनग्रेडियंट्स ठेवू नका. त्याऐवजी वेळ आणि एनर्जी वाचवण्यासाठी एकाचवेळी पँट्रीतून डिशसाठी लागणारे सर्व घटक एकत्र भांड्यात काढून घ्या. (How to reduce kitchen clutter; Learn important tips)

स्वयंपाक घरातील दगदग कमी कशी करायची; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
स्वयंपाक घरातील दगदग कमी कशी करायची; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
| Edited By: | Updated on: Jun 01, 2021 | 8:40 AM
Share

मुंबई : जेवण बनवणे सोपे काम नाही. जेवणासाठी तास-दोन तास स्वयंपाक घरात खर्च करणे म्हणजे काय कसरत करावी लागते हे गृहिणींनाच चांगले ठाऊक असते. उन्हाळ्याच्या दिवसात गॅससमोर उभे राहणे म्हणजे मोठी डोकेदुखीच. कारण गॅसपासून उष्णतेत आणखी वाढ होते, मग किचनमध्ये थांबायचे म्हटले घामाच्या धारा सुरू होतात. अशावेळी जेवण चटकन कसे आवरता येईल, याकडे गृहिणींचा कल असतो. रोजरोज स्वयंपाक करून अनेक महिलांना स्वयंपाक वेळेत आवरण्याचे कौशल्य जमतेही. मात्र स्वयंपाक घरात पहिल्यांदा जेवण बनवण्याच्या निमित्ताने सक्रीय राहिलेल्या नवविवाहितेला ते कौशल्य जमणे म्हणजे काही काळासाठी अशक्यप्राय गोष्ट असते. कुठलाही खाद्यपदार्थ वेळेत बनवण्यासाठी नेमक्या कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत, ते आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत. गृहिणींना या टिप्स अत्यंत उपयुक्त आहेत. (How to reduce kitchen clutter; Learn important tips)

स्वयंपाकासाठी लागणारे घटक आपल्या जवळपासच अर्थात आपल्या हाताच्या अंतरावर असायला पाहिजेत. म्हणजेच गॅसवर काहीतरी शिजायला ठेवलेय व त्यात एखादा-दुसरा घटक टाकायचा राहिला असेल तर तो वेळेत टाकता आला पाहिजे. स्वयंपाक घरात आपण घामाघूम होऊन जात असतो. अशावेळी आपण भाज्या जितक्या लवकरात लवकर कापता येतील, तितक्या लवकर कापण्याचा प्रयत्न करीत असतो. वेळेत भाज्या कापून घेतल्या नाहीत तर गॅस तवा किंवा कढई ठेवली असेल तर त्यातील तेल अधिक गरम होऊन जाईल. त्यामुळे आपण बनवत असलेल्या पदार्थांची चव बिघडू शकेल. काही ऑर्गनायझेशनल तंत्रे आहेत, जी तुम्हाला स्वयंपाक बनवण्यात निष्णात बनवू शकतील. या तंत्रांमुळे स्वयंपाक घरात लागणारी जास्तीची एनर्जीदेखील वाचेल.

चार महत्त्वाच्या टिप्स

– काउंटरवर केवळ पहिल्या टप्प्यासाठी इनग्रेडियंट्स ठेवू नका. त्याऐवजी वेळ आणि एनर्जी वाचवण्यासाठी एकाचवेळी पँट्रीतून डिशसाठी लागणारे सर्व घटक एकत्र भांड्यात काढून घ्या.

– जेव्हा आपण कोणतीही डिश तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा कोणतीही रेसिपी फॉलो करीत असू तर त्यात वापरले जाणारे घटक आणि रेसिपीच्या क्रमावर लक्ष ठेवा. त्याच क्रमानुसार सर्वकाही तयार करा. भाज्या कापण्यापासून ते इनग्रेडियंट्स मापण्यापर्यंत सर्व तयारी आधीच करा. त्यामुळे जेवण बनवताना तुम्ही गोंधळून जाणार नाहीत.

– सॉस व इतर मसाल्यांना अशा डब्यामध्ये ठेवा, ज्या डब्यांचे झाकण दाबल्यानंतर चटकन उघडू शकेल. सॉसच्या बाटलीची झाकण उघडून नंतर त्यातील सॉसचे योग्य प्रमाण घेऊन ते खाद्यपदार्थासाठी वापरणे हे खूप वेळखाऊ काम बनेल. म्हणूनच दाब दिल्यानंतर झाकण उघडेल, अशा बाटलीत सॉस आणि इतर मसाले ठेवा.

– आपल्या इनग्रेडियंट्सची वर्गवारी करा. नमकीन इनग्रेडियंट्स एका शेल्फवर ठेवा आणि बॅकिंग इनग्रेडियंट्सला दुसऱ्या शेल्फवर ठेवा. त्यामुळे तुम्हाला ज्यादा त्रास न घेता आवश्यक ते इनग्रेडियंट्स सहज उपलब्ध होतील. अधिक शोधाशोध करावी लागणार नाही. (How to reduce kitchen clutter; Learn important tips)

इतर बातम्या

PHOTO | शेअर बाजाराकडून 100 कोटी कमावणाऱ्या व्यक्तीचा गुंतवणूकदारांना सल्ला, या स्टॉक्सपासून दूर राहिल्यास होणार नाही नुकसान

SBI ग्राहकांनी खाती KYC केली नाहीत तर काय होईल? जाणून घ्या

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.