
पावसाळा ऋतू थंडावा आणि आरामदायी वातावरण देतो, परंतु या दिवसांमध्ये आपण जशी आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो, तसेच तुमच्या घरात जर एखादे पाळीव प्राणी असतात, त्यांची सु्द्धा पावसाळ्यात काळजी घ्यावी. कारण हे वातावरण पाळीव प्राण्यांसाठी अनेक समस्या निर्माण करतात. सततचा पाऊस, मातीतील घाण, बॅक्टेरिया आणि कीटकांची वाढती संख्या केवळ पाळीव प्राण्याच्या आरोग्यावर परिणाम करत नाही तर त्यांच्या मनःस्थिती आणि वर्तनातही बदल घडवून आणू शकते. या ऋतूमध्ये त्वचेचे संक्रमण, ओले आणि दुर्गंधीयुक्त केस, खाण्याचे विकार आणि चालताना समस्या सामान्य होतात. अशावेळेस पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
जर तुमच्याकडे पाळीव प्राणी असेल तर पावसाळ्यात तुम्हाला त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या लेखात आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या आणि सोप्या टिप्स सांगतो, ज्याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यातही तुमच्या कुत्र्याला किंवा मांजरीला किंवा इतर पाळीव प्राणी आनंदी, निरोगी आणि सक्रिय ठेवू शकता.
सर्वप्रथम तुमच्या पाळीव प्राण्याला पावसात भिजण्यापासून वाचवा. कारण पावसात भिजल्यानंतर पाळीव प्राण्याचे केस ओले आणि दुर्गंधीयुक्त होऊ शकतात. केस ओले असल्याने त्यांना बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही बाहेरून याल तेव्हा त्यांना टॉवेलने चांगले पुसा. गरज पडल्यास ड्रायर वापरा आणि केस कोरडे ठेवा.
पावसाळ्यात गोष्टी लवकर खराब होऊ शकतात. यासाठी पाळीव प्राण्यांचे अन्न पदार्थ जास्त वेळ बाहेर ठेवू नका. तुमच्या पाळीव प्राण्यांना नेहमीच ताजे अन्न द्या. तसेच, दिवसातून 2-3 वेळा त्यांची भांडी धुवा किंवा बदला. पाळीव प्राण्यांनी रस्त्यावरून काहीही खाऊ नये याचा प्रयत्न करा, कारण या ऋतूमध्ये संसर्गाचा धोका जास्त असतो.
पावसाळ्यात अनेक प्रकारचे पावसाळी कीटक अनेकदा बागेज किंवा रस्त्यावर येतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना बाहेर काढता तेव्हा ते कीटक त्यांच्या पायांना चिकटू शकतात. किंवा त्यांचे पाय घाणेरड्या पाण्यात जाऊ शकतात, ज्यामुळे घरात संसर्ग वाढतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याला बाहेर काढता तेव्हा परत आल्यानंतर त्यांचे पाय स्वच्छ करा. त्यांची नखे आणि पंजे नियमितपणे तपासा.
पावसाळ्यात आर्द्रता वाढते, त्यामुळे हे पाळीच प्राण्यांची बसलेली जागाही ओली होते आणि दुर्गंधी येऊ शकते. म्हणून, पावसाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांना झोपण्यासाठी नेहमीच कोरडी जागा द्या. त्यांचे अंथरूण स्वच्छ आणि कोरडे ठेवा. तसेच, आठवड्यातून किमान एकदा अंथरूण धुवा आणि उन्हात वाळवा.
पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग, अतिसार आणि त्वचेच्या ॲलर्जीसारख्या समस्या सामान्य असतात. म्हणून, तुमच्या पाळीव प्राण्यांना नियमितपणे प्राण्यांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या आणि आवश्यक असलेले सर्व लसीकरण वेळेवर करा. कोणतीही लक्षणे दिसल्यास निष्काळजी राहू नका.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)