AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही जर कलिंगडासोबत ‘हे’ पदार्थ खात असाल तर आताच थांबा, अन्यथा आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी कलिंगडाचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. मात्र काही विशिष्ट पदार्थांसोबत कलिंगड खाणे टाळावे. या लेखात आपण अशा चार पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे कलिंगडसोबत कधीही खाऊ नयेत.

तुम्ही जर कलिंगडासोबत 'हे' पदार्थ खात असाल तर आताच थांबा, अन्यथा आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
| Edited By: | Updated on: May 29, 2026 | 6:39 PM
Share

उन्हाळ्यात कलिंगड हे हंगामी फळ सर्वांचे आवडते असल्याने प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन केले जाते. कलिंगड खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यासोबतच डिहायड्रेशनची समस्या देखील सतावत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की काही विशिष्ट पदार्थांसोबत कलिंगड खाणे फायद्याऐवजी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते? लोकं अनेकदा विचार न करता कधीही कोणत्याही पदार्थासोबत कलिंगड खातात, ज्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. यासाठीच आपण कोणत्या पदार्थांसोबत कलिंगड खाऊ नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

खरं तर कलिंगडाचे गुणधर्म आणि पचन प्रक्रिया इतर फळे आणि पदार्थांपेक्षा थोडी वेगळी असते. कलिंगड ‍हे खूप लवकर पचते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कलिंगड खातात तेव्हा त्यासोबत जर काही पदार्थांचे सेवन केल्यास ते पचायला जास्त वेळ लागतो. एकत्र खाल्ल्यास पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो आणि गॅस, आम्लपित्त किंवा अपचनासारख्या समस्या उद्भवू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या पदार्थांसोबत कलिंगड खाऊ नये हे जाणून घेऊयात.

दुधासोबत कलिंगड

आयुर्वेद तज्ञ सांगतात की दुधासोबत कलिंगड न खाण्याचा सल्ला देतात, कारण कलिंगड हे खूप लवकर पचणारे फळ आहे, तर दूध पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन गॅस, आम्लपित्त आणि पोटात जडपणा जाणवू शकतो.

दह्यासोबत कलिंगडचे सेवन टाळा

तज्ञांच्या मते दही आणि कलिंगड एकत्र खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. दही आणि कलिंगड एकत्र खाल्ल्याने पोटावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. या मिश्रणामुळे शरीरात उष्ण-थंड तापमान असंतुलन होते, ज्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे, त्यांनी हे विशेषतः टाळावे.

जड तळलेले अन्न

तळलेले पदार्थ आणि कलिंगड यांचे मिश्रण देखील आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. कलिंगड आणि सोबतच जड तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. कलिंगड लवकर पचते, पण तेलकट पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे पचनसंस्थेचा समतोल बिघडतो, ज्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि आम्लपित्त यांसारख्या समस्या उद्भवतात.

थंड पेये किंवा बर्फाचे पाणी

कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी किंवा थंड पेय पिणे देखील हानिकारक ठरू शकते. याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे पोटात गोळा येणे, गॅस किंवा अपचन होऊ शकते. कलिंगड खाल्ल्यानंतर काही काळ पाणी पिणे टाळणे उत्तम.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला.

Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला

रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश.

रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण.

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या