झोप लागत नाही तर या गोष्टींचे करा सेवन, पडताच झोपी जाल

झोप येण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयोग करतात. कोणी गाणी ऐकतात, कोणी वाचन करतात तर कोणी नामस्मरण करतात. पण तरी देखील अनेकांना वेळेत झोप लागत नाही. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण ही समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करु शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.

झोप लागत नाही तर या गोष्टींचे करा सेवन, पडताच झोपी जाल
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 8:43 PM

Sleep problems : आजकाल अनेकांना झोप न येण्याची समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे याचे प्रमाण वाढत आहे. झोप न लागण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे मानसिक तणाव, हृदयविकार किंवा नैराश्य. त्यामुळे जर तुम्हाला देखील झोप लागत नसेल तर तुम्ही आधी त्याचे कारण शोधले पाहिजे. या सोबतच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पण सामान्य स्थितीत तुम्ही चांगली झोप यावी म्हणून काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करु शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, झोपण्याच्या 45 मिनिटे आधी तुम्ही ट्रिप्टोफॅनचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोप लागू शकते. ट्रिप्टोफॅन हे अत्यावश्यक अमीनो आम्ल आहे जे बहुतेक प्राण्यांचे मांस, कुक्कुटपालन आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच नट-बियाणे, संपूर्ण धान्य आणि शेंगांमध्ये आढळते.

ट्रिप्टोफॅन आपल्या शरीरात मेलाटोनिन आणि सेरोटोनिन तयार करते. मेलाटोनिन झोपे-जागण्याच्या चक्राचे नियमन करण्यास मदत करते आणि सेरोटोनिन भूक, झोप, मूड आणि वेदना नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणून, तुम्ही ट्रिप्टोफॅन असलेले हे पदार्थ सेवन करावे जे झोपेसाठी उपयुक्त आहेत.

कोणती गोष्ट खाल्ल्याने लवकर झोप लागते?

1. केळी आणि मध

झोपण्यापूर्वी जर तुम्ही केळी आणि मध यांचे एकत्र सेवन केले तर तुम्हाला सहज झोप लागू शकते. दोन्ही गोष्टी बाजारात सहज उपलब्ध होतात. केळीमध्ये ट्रिप्टोफॅन असते ज्यामुळे झोप येते तर मधाचे सेवन केल्याने ओरेक्सिन रिसेप्टर्स शांत होतात जे मेंदूला जास्त काळ जागृत ठेवतात. यामुळे झोप येते आणि काही वेळातच तुम्ही झोपी जाता.

2. बदाम

बदाम हे हेल्दी फॅट्स, एमिनो ॲसिड आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. जे तुम्हाला लगेच झोप येण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. जर तुम्ही एक ग्लास कोमट दुधात थोडे मध आणि बदाम मिसळून प्यायले तर तुम्हाला लवकर झोप लागेल.

3. दूध

ट्रिप्टोफॅन तयार करण्यासाठी प्रथिने देखील आवश्यक असतात. त्यामुळे तुम्ही रात्री एक ग्लास दूध प्यायले तर त्याचा तुमच्या मेंदूवर शांत प्रभाव पडतो. तसेच न्यूरॉन्सला विश्रांती मिळते आणि झोप लवकर येते. झोप येण्यासाठी दूध हा एक उत्तम उपाय आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.