AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यामध्ये पाहिजे असेल तेजस्वी चेहरा तर, ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

हिवाळ्यात त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यावी, हे अनेकांना माहित नसते. आहारात काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने या समस्येपासून आराम मिळू शकतो.

हिवाळ्यामध्ये पाहिजे असेल तेजस्वी चेहरा तर, 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 8:33 PM
Share

हिवाळा सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. हिवाळ्यात आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेणे ही आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचा निरोगी, हायड्रेट आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते. हिवाळात कोरडी त्वचा असणाऱ्यांनी त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा त्वचेची व्यवस्थित काळजी घेऊन सुद्धा त्वचा वारंवार कोरडी होते. हिवाळ्यात कोरडी त्वचा होण्याची समस्या टाळण्यासाठी तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थ समाविष्ट करू शकतात. हे खाद्यपदार्थ तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतील. जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत जे हिवाळ्यात तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतील.

रताळे रताळे व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे. रताळे तुमच्या त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ च्या मते एका भाजलेल्या रताळ्यामध्ये 1,403 mcg व्हिटॅमिन ए असते. यासोबतच ते वयानुसार येणाऱ्या सुरकुत्यांवर देखील प्रभावी आहे.

एवोकॅडो एवोकॅडोमध्ये जीवनसत्वे आणि व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असतात. मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्सने एवोकॅडो समृद्ध आहे. जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. यासोबतच एवोकॅडो मध्ये असलेले जीवनसत्वे त्वचेतून मृत पेशी काढून टाकण्यास देखील मदत करतात. ग्लूटामाइन अमीनो एसिड मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते. एवोकॅडो तसेच खाऊ शकता किंवा त्याचा शेक करून देखील पिऊ शकता.

किवी किवी हा व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत आहे. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार एका किवीमध्ये 64 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. तुम्ही तुमच्या नाष्टा स्मुदी किंवा सॅलडमध्ये किविचा समावेश करू शकता.

ग्रीन टी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत तुम्ही ग्रीन टी चा समावेश करू शकता. त्यामुळे तुम्हाला निरोगी आणि उत्तम त्वचा मिळेल. ग्रीन टी मुळे हायपर पिग्मेंटेशन आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. रोज सकाळी दुधाचा चहा पिण्याच्या ऐवजी तुम्ही ग्रीन टी चे सेवन केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील.

हळद कोरडी त्वचा टाळण्यासाठी हळद फायदेशीर ठरू शकते. हळदी मध्ये असलेल्या करक्यूमिन तत्वामुळे ही दाहक विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार कर्क्यूमिन त्वचारोग कमी करण्यास मदत करू शकते. दुधा किंवा भाजीमध्ये हळद टाकल्याने त्वचेच्या अनेक समस्या नाहीशा होतील.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.