रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या ओव्याचे पाणी

सध्या देशामध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोना रूग्णांची संख्या ही वाढत आहे. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या ओव्याचे पाणी
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 10:27 AM

मुंबई : सध्या देशामध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोना रूग्णांची संख्या ही वाढत आहे. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कारण कोरोना रूग्णाला रुग्णालयात साधा बेड देखील मिळत नाहीये. यामुळे कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपण सर्वांनीच आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हेल्ही आहारा, व्यायाम आणि रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल हे बघितले पाहिजे. (Immunity Drink Ajwain water to increase)

ओव्याचे पाणी तयार करण्यासाठी

साहित्य

1. एक चमचा ओव्याची दाणे

2. तुळशीची पाने

3. अर्धा चमचे मिरपूड पावडर

4. एक चमचे मध

तयार करण्याची पद्धत एक कढई घ्या आणि त्यात एक ग्लास पाणी, ओव्याचे दाणे, तुळसीची पाने आणि मिरपूड पावडर मिक्स करावे आणि सुमारे 5 मिनिटे उकळी येऊ द्या. हे मिश्रण एका कपमध्ये घ्या आणि थंड झाल्यावर मध घाला आणि प्या.

रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल ओव्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ओव्याच्या या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत. यात दाह-विरोधी गुणधर्म आहेत जे आपल्याला सर्दी आणि कफपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय तुळशीची पाने, काळी मिरी आणि मध तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. जेणेकरून तुम्ही आजारांपासून दूर राहाल.

पोटदुखी, गॅस, अपचन झाल्यास ओव्यासह काळे मीठ आणि चिमूटभर हिंग घालून खाल्ले जाते. वास्तविक, ओव्यामध्ये थायमोल नावाचे एक कंपाऊंड, अँटीस्पास्मोडिक आणि कॅमेनिटिव गुणधर्म असतात, जे पोटातील वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी औषध म्हणून काम करतात काही लोकांचे केस अकाली पांढरे होऊ लागतात. ओवा केस अकाली पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतो. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा कढीपत्ता, मनुका, साखर आणि ओवा घालून त्याचा काढा तयार करा. या काढ्याचे नियमित सेवन केल्यामुळे केस अकाली पांढरे होणार नाहीत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Immunity Drink Ajwain water to increase)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.