AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहारात सोयाबीनचा समावेश करा आणि विविध व्याधी दूर पळवा; जाणून घ्या विविध जबरदस्त फायदे

सोयाबिनमुळे तुम्ही विविध व्याधींना दूर लोटू शकाल. तुम्हाला अंडे, दुध आणि मटण खाऊन जेवढे प्रोटीन्स मिळतात, त्याच्यापेक्षाही अधिक प्रोटीन्स सोयाबीनपासून मिळतात. (Include beans in the diet and get rid of various ailments; know the various tremendous benefits)

आहारात सोयाबीनचा समावेश करा आणि विविध व्याधी दूर पळवा; जाणून घ्या विविध जबरदस्त फायदे
आहारात सोयाबीनचा समावेश करा आणि विविध व्याधी दूर पळवा
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 9:03 AM
Share

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे आपल्याला आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज कळली आहे. त्यामुळे आपण आहाराकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्या पदार्थांपासून आपल्या शरीरातील विविध व्याधी दूर होतील. सोयाबीनचा वापरदेखील यापैकीच एक उपाय म्हणून विचारात घ्या आणि तुमच्या आहारामध्ये सोयाबीनचा अंतर्भाव करा. सोयाबिनमुळे तुम्ही विविध व्याधींना दूर लोटू शकाल. तुम्हाला अंडे, दुध आणि मटण खाऊन जेवढे प्रोटीन्स मिळतात, त्याच्यापेक्षाही अधिक प्रोटीन्स सोयाबीनपासून मिळतात. (Include beans in the diet and get rid of various ailments; know the various tremendous benefits)

सोयाबिनमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ई, मिनरल्स आणि एमिनो अ‍ॅसिड पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विविध गरजांची पूर्तता होते, तसेच अनेक गंभीर व्याधी दूर होतात. शारीरिक विकास, त्वचेशी संबंधित समस्या आणि केसांची समस्यादेखील सोयाबीनचे सेवन केल्यामुळे दूर होऊ शकेल.

सोयाबीन खाण्याचे फायदे

कर्करोगापासून संरक्षण करते

कर्करोग हा दुर्धर आजार मानला जातो. त्यावर प्रभावी औषध नसल्याने कर्करोगाची चिंता संपलेली नाह. मात्र सोयाबीन या चिंतेवर एक प्रभावी उपाय असेल. सोयाबीनचे सेवन करून तुम्ही कर्करोगासारख्या दुर्धर आजारापासून स्वत:चे रक्षण करू शकाल. सोयाबीनमधील फायबर कंटेट कोलोन कर्करोगाचा धोका कमी करण्यास खूप उपयुक्त ठरतात.

हाडे मजबूत होतात

सोयाबीनचे सेवन केल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नीशियम, कॉपर, सेलेनियम आणि जिंकसुद्धा पुरेशा प्रमाणात असतात. ही सर्व पोषक तत्त्वे शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण योगदान देतात.

मधुमेहामध्ये फायदेशीर

सध्याच्या घडीला मधुमेह हा आजार सर्वांची काळजी वाढवणारा आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला मधुमेहाचा त्रास रोखण्यासाठी सोयाबीनचे सेवन करणे आवश्यक आहे. सोयाबीनमधील प्रोटीन ग्लुकोजला नियंत्रित करतात आणि इन्सुलिनमध्ये येणारा अडथळा कमी करू शकतात.

मानसिक संतुलन ठीक ठेवते

आजच्या घडीला लोक अनेक ताणतणावांचा सामना करताहेत. रोज तणावाच्या गोष्टींचा विचार करून मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. हे मानसिक आजार आपण रोखू शकतो. अर्थात आपले मानसिक संतुलन ठीक ठेवण्यासाठी आपण सोयाबीनचे सेवन केले पाहिजे. सोयाबीन मानसिक संतुलन ठीक करून बुद्धीला चालना देते. (Include beans in the diet and get rid of various ailments; know the various tremendous benefits)

इतर बातम्या

चिकनमुळे ब्लॅक फंगस पसरतोय का? जाणून घ्या या दाव्यामागील सत्य

विमा धारक हरवल्यास कुटुंब कशा पद्धतीनं मिळवू शकतात विमा हक्क, 4 सोपे मार्ग जाणून घ्या…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.