Vitamin-Rich Superfoods : ताण-तणाव कमी करण्यासाठी आहारात ‘या’ व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करा

Vitamin-Rich Superfoods : ताण-तणाव कमी करण्यासाठी आहारात 'या' व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करा
हेल्दी आहार

या कोरोनाच्या काळात अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे, कुणी आपले जवळची माणसे गमावली आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 06, 2021 | 3:39 PM

मुंबई : या कोरोनाच्या काळात अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे, कुणी आपले जवळची माणसे गमावली आहेत. या सर्वाचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. लोक तणाव, नैराश्याचा सामना करीत आहेत. तणाव कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय देखील करत आहे. मात्र, तणाव कमी करण्यासाठी व्हिटॅमिनयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे. (Include vitamins in your diet to reduce stress)

संत्री

संत्रामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे तणाव हार्मोन कमी करण्यात मदत करते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांवर केलेल्या अभ्यासानुसार व्हिटॅमिन सीयुक्त आहार बराच फायदेशीर आहे. हे रक्तदाब, कोर्टिसोल आणि तणाव हार्मोन कमी करण्यास मदत करतात.

पालक

पालक ही एक पौष्टिक भाजी आहे. यात कॅल्शियम, बी-जीवनसत्त्वे, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. पालकमध्ये तणाव आणि चिंता कमी करणारे पदार्थ असतात. एक कप पालकमध्ये, 157 मिलीग्राम मॅग्नेशियम आढळते, जे आपल्या रोजच्या गरजेच्या 40 टक्के आहे. मॅग्नेशियमची कमतरता असल्यास डोकेदुखी, थकवा आणि तणाव वाढतो.

अंडे

अंडे जीवनसत्त्वे, खनिजे, अमीनो अॅसिडस् आणि अँटिऑक्सिडेंट्सने समृद्ध असतात. हे सर्व स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यास मदत करतात. अंडी कोलोनमध्ये समृद्ध असतात. मेंदू निरोगी राहण्यास ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते तणावापासून वाचविण्यात मदत करतात.

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडोला एक सुपर फूड देखील म्हटले जाते, जे ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, फायटोकेमिकल्स, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. अ‍व्होकाडोमध्ये पोटॅशियमही असते. हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

ब्लूबेरी बेरी

ब्लूबेरी बेरी हे फळ दिसण्यासाठी छोटे असले तरी यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी जास्त असते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपल्या शरीरास पेशी निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटची आवश्यकता असते. असा वेळा आपण ब्लूबेरी बेरीचे सेवन केले पाहिजे.

अश्वगंधा

अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जी आपला शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही आपल्या आहारात अश्वगंधाचा समावेश अनोख्या पद्धतीने करू शकता. यासाठी तुपामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळावे. नंतर त्यात खजूर, मध, गूळ किंवा साखर घाला. ही पेस्ट दुधात मिक्स करून दिवसातून एकदा प्या. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Include vitamins in your diet to reduce stress)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें