तुम्ही आवडीने खात असलेला ‘फालूदा’ भारतात कसा आला? जाणून घ्या इतिहास
फालूदा जगभरात खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक देशात फालूदा वेगवेगळ्या प्रकारे बनवला आणि खाल्ला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही जो आवडीने खात असलेला फालूदा आपल्या भारतात कसा आला?

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फालूदा हा थंडगार गोड पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो. फालूदा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे हा फालूदा संपुर्ण भारतात खूप लोकप्रिय आहे. तर हा फालूदा नूडल्स म्हणजेच शेवया, गुलाब सिरप, दूध आणि सब्जा बियाणे, काजू, बदाम यांसारखे प्रकार एकत्र करून बनवला जातो. तर याला फालूदा कुल्फी असेही म्हणतात. त्यामुळे फालूदा आपल्याकडे खूप प्रसिद्ध झालेला आहे. अशातच असे काही लोकं असतील ज्यांना क्वचितच फालूदा हा पदार्थ खायला आवडत नाही. त्यात पण फार कमी लोकांना माहित असेल की फालूदा हा पारंपारिक भारतीय डेजर्ट म्हणजे गोड पदार्थ नाही. तर हा फालूदा आपल्या देशात कोठून आला हे देखील क्वचितच कोणाला माहिती असेल.
इतिहासकारांच्या मते फालूदा हा इराणमधून भारतात आला आहे, जिथे त्याला फालूदाह असे म्हणतात. तर त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग या लेखात आपण जाणून घेऊया की हा स्वादिष्ट गोड फालूदा इराणमधून भारतात कसा आला.
फालूदा इतिहास
फालूदा हा इराणचा पारंपारिक गोड पदार्थ आहे. तर फालूदा हा पर्शिया म्हणजेच सध्याचे इराण मध्ये उगम पावला. तर इराणमध्ये फालूदा हा आनंदाच्या प्रसंगी आणि सणासुदीच्या वेळेस खाल्ला जातो. तर याला इराणमध्ये फालूदाह असे म्हणतात. फालूदा जगातील सर्वात जुन्या गोड पदार्थांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की फालूदा इ.स.पूर्व 400 पासून खाल्ला जात आहे. हा खास गोड पदार्थ इराणमध्ये एका खास प्रसंगी खाल्ला जातो ज्याला ‘जमशेदी नवरोज’ असे म्हणतात.
फालूदा भारतात कसा पोहोचला?
तर काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की फालूदा मुघल काळात भारतात आला. असे म्हटले जाते की भारतात आलेले मुघल त्यांच्यासोबत अनेक गोष्टी घेऊन आले होते. फालूदा देखील त्यापैकी एक होता. असे मानले जाते की फालूदा 16 व्या ते 18 व्या शतकात मुघल सम्राट अकबराचा मुलगा जहांगीरसोबत भारतात पोहोचला. वेगवेगळ्या पाककृतींचा शौकीन असलेल्या जहांगीरने जेव्हा हा इराणी गोड पदार्थ म्हणजे फालूदा खाल्ल्यावर खूप आवडले. त्यानंतर त्याच्यासोबत फालूदा आपल्या भारतात पोहोचला. तर काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की फालूदा नादिर शाहसोबत भारतात आला. हळूहळू, फालूदा भारतीय आहाराचा भाग बनला आणि देशाच्या इतर भागातही पोहोचला. त्यानंतर हा गोड फालूदा हळूहळू संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला आणि आज देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या आवडीने खाल्ला जातो.
यानंतर फालूदा हा वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला जाऊ लागला. अनेक ठिकाणी फालूदा आईस्क्रीमसोबत खाल्ला जातो. तर काही ठिकाणी फालूदा बनवण्यासाठी शेवया नूडल्स, गुलाब सिरप, दूध आणि सब्जा बियांसोबत बनवला जातो. याशिवाय, आजकाल तो बटरस्कॉच फालूदा, चॉकलेट फालूदा, कुल्फी फालूदा, शिराजी फालूदा, मसाला फालूदा, पिस्ता आईस्क्रीम, केशर चव आणि मँगो शेकसोबतही मोठ्या आवडीने खाल्ला जातो. उत्तर भारतात फालूदा रबडीसोबत खायला आवडतो. रबडी फालूदा साखर, दूध आणि वेलची मिसळून बनवला जातो.
फालुदा जगभरात वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध
केवळ इराण आणि भारतातच नाही तर भारताव्यतिरिक्त, हा गोड पदार्थ इतर देशांमध्येही खूप लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. तसेच फालूदा हा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. सिंगापूर आणि मलेशियामध्येफालुदाला कॉन्डोल म्हणतात. तर मॉरिशसमध्ये अलुदाह आणि फिलीपिन्समध्ये हॅलो-हॅलो असे म्हणतात. तर भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानमध्ये फालुदा आईस्क्रीमसोबत खाल्ला जातो.
