स्वस्तात दुबईला जाण्याची संधी! आयआरसीटीसीकडून खिशाला परवडणारं टूर पॅकेज जाहीर

तुम्हाला दुबई फिरण्याची इच्छा आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार रात्र आणि पाच दिवसांचं दुबई पॅकेज जाहीर केलं आहे. स्वस्तात मस्त पॅकेज असून संपूर्ण माहिती जाणून घ्या

स्वस्तात दुबईला जाण्याची संधी! आयआरसीटीसीकडून खिशाला परवडणारं टूर पॅकेज जाहीर
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 7:56 PM

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) आपल्या प्रवाशांसाठी देश-विदेशात कमी किमतीत सतत नवनवीन आणि नाविन्यपूर्ण टूर पॅकेजेस सादर करत आहे. असंच एक खास पॅकेज आयआरसीटीसीने जाहीर केले आहे. जर तुम्हाला दुबईत फिरण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दुबईत फिरण्याची अनेकांची इच्छा असते, पण बजेट नसल्याने हात आखुडता घ्यावा लागतो. असं असलं तरी अनेक पर्यटकांचं ड्रीम डेस्टिनेशन आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. मोठे मोठे शॉपिंग मॉल, स्वच्छ शहरं पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. तुम्हाला दुबईला जाण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण खिशाला परवडणारं पॅकेज इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केलं आहे. यात पाच दिवस आणि चार रात्र असं पॅकेज आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, पुणे, चेन्नई आणि चंदीगडसह अनेक शहरांना हे पॅकेज लागू आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला मिरॅकल गार्डन, धो क्रूझ, बुर्ज-अल-खलिफा, शेख झायेद मशीद, BAPS हिंदू मंदिर आणि ग्लोबल व्हिलेजसह दुबई आणि अबू धाबीच्या प्रमुख आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकता.

मुंबईतून जाणाऱ्या प्रवाशांसाठी टूर 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान असेल आणि दिल्लीहून जाणाऱ्या प्रवाशांसाठी टूर पॅकेज 24 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत असेल. बंगळुरुहून 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2025 पर्यंत हे पॅकेज असणार आहे. चेन्नई शहरातून टूर पॅकेज 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत उपलब्ध असेल तर चंदीगड ते दुबई ट्रिप पॅकेज फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल, अशी घोषणा आयआरसीटीसीने केली आहे.

तुम्हाला दुबईला जाण्याची इच्छा असेल तर दिल्ली ते दुबई पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 1.04 लाख ते 1.09 लाख रुपये आहे. मुंबईतून पॅकेजची सुरुवात 1.02 लाखांपासून होणार आहे. बंगळुरूहून या पॅकेजची सुरुवात 92 हजारांपासून सुरू होते आणि चेन्नईपासून दुबईपर्यंतच्या सहलीचा खर्च 91 हजारांपासून सुरू होतो. चंदीगडहून या पॅकेजची किंमत 1.2 लाखांपासून सुरू होते. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.irctctourism.com ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.