AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सूर्यनमस्कार फायदेशीर आहे का? ते करण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

सूर्यनमस्कार केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. तसेच शरीर तंदुरस्त राहण्यासाठी नियमीत सुर्यनमस्कार करावे. यामध्ये 12 योगासनांचा समावेश आहे जे संपूर्ण शरीराला कार्यरत करतात. याशिवाय, ते पचन सुधारते. हे तुमच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण मधुमेहाच्या रूग्णांसाठी सूर्यनमस्कार फायदेशीर आहे का? हे जाणून घेऊयात...

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सूर्यनमस्कार फायदेशीर आहे का? ते करण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या
surya namaskarImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Apr 22, 2025 | 3:12 PM
Share

आजकाल प्रत्येक व्यक्तीला मधुमेह हा आजार होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे व खाण्यापिण्यच्या चुकीच्या सवयीमुळे मधुमेह हा आजार अनेकांना होत चालेला आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे हल्ली लहान मुल देखील मधुमेहाचे शिकार होत आहे. यासाठी मधुमेही रुग्णांच्या जीवनशैलीत सूर्यनमस्कार खूप फायदेशीर ठरत आहे. कारण या योगामुळे साखरेची पातळी कमी होते तसेच वजनही कमी होते. शिवाय, पचन प्रक्रिया देखील सुधारते. मधुमेही रुग्णांसाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे. सूर्यनमस्कार कसे करायचे ते सविस्तरपणे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊया.

सूर्यनमस्कार यामध्ये 12 योगासनांचा समावेश आहे जे संपूर्ण शरीराला कार्यरत करतात. याशिवाय सूर्यनमस्कार केल्याने आपली पचनक्रिया सुधारते. त्यामुळे नियमित सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण असे केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच तुमची हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली देखील मजबूत होते.

चला जाणून घेऊया सूर्यनमस्काराचे फायदे

सूर्यनमस्कार केल्याने पचनसंस्था सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतेची समस्याही कमी होते. याशिवाय, ताण आणि तणाव देखील कमी होतो.

सूर्यनमस्कार शरीराला लवचिक बनवतो आणि सांधेदुखी देखील कमी करतो.

एका प्रकारे, ते संपूर्ण शरीराला सक्रिय करण्याचे काम करते. याशिवाय, ते शरीराला टोन देण्याचे आणि स्नायूंना बळकटी देण्याचे काम करते. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सूर्यनमस्कार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांना नक्कीच विचारा.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर

सूर्यनमस्कार केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याशिवाय, ते शरीरात होणाऱ्या किरकोळ संसर्गांना दूर करण्यास देखील मदत होते.

श्वसनाच्या समस्या दूर करते

सूर्यनमस्कार श्वसनाच्या समस्या दूर करते. बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांचे श्वसनमार्गातील संसर्ग दूर करते आणि फुफ्फुसांची क्षमता आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह देखील वाढवते.

रक्ताभिसरण सुधारते

शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्याकरिता सूर्यनमस्कार नियमित करा. याशिवाय सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या एकूण आरोग्य आणि केसांना निरोगी ठेवते. सूर्यनमस्कार ही एक पॉवरफुल पद्धत आहे. यामुळे शरीर, श्वास आणि चेतना यांच्यात खोल संबंध निर्माण करते. ते शरीराला जागरूक करण्याचे काम करते.

शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी हे फायदेशीर

सूर्यनमस्कार करताना श्वास घेण्याच्या पद्धतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यामुळे तुमच्या फुफ्फुसांपर्यंत हवा योग्यरित्या पोहोचते, ज्यामुळे रक्ताला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. ज्यामुळे ते शरीराला आतून डिटॉक्स करण्याचे काम करते. एवढेच नाही तर ते शरीराला आतून स्वच्छ करण्याचे काम करते.

वजन झपाट्याने कमी करते

सूर्यनमस्कार केल्याने पोट आणि स्नायू ताणले जातात. जे वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे चयापचय देखील सुधारते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.