AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोगी राहण्यासाठी ‘या’ जपानी सवयींचं करा पालन आणि जगा आनंदी आयुष्य

जपानमध्ये असंख्य लोक निरोगी आयुष्य जगतात, त्यामागे कारण देखील तसं आहे. जापानी लोक काही अशा नियमांचं पालन करतात, जे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात... तर जाणून घ्या कोणते आहेत 'ते' नियम...

निरोगी राहण्यासाठी 'या' जपानी सवयींचं करा पालन आणि जगा आनंदी आयुष्य
| Updated on: Jun 16, 2026 | 2:25 PM
Share

जपान येथील लोक कायम स्वतःच्या आरोग्याबद्दल जागृत असतात. ज्यामुळे ते निरोगी आयुष्य जगतात. निरोगी राहण्यासाठी तुम्ही देखील काही सवयींचं पालन केल्यास आनंदी आयुष्य नक्कीच जगाल… सांगायचं झालं तर, जपान हा एक असा देश आहे जो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद, शांती आणि स्थिरतेसाठी ओळखला जातो. येथील लोक निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून निरोगी आयुष्य जगतात. या लहान आणि प्रभावी आरोग्यदायी सवयी अंगीकारून, तुम्हीसुद्धा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकता. तर जाणून घ्या जपानी लोक का निरोगी राहतात…

पौष्टिक आहार : जपानी लोक कायमच पौष्टिक आहार घेतात. त्यांच्या जेवणात प्रामुख्याने भात आणि हिरव्या भाज्या, भाजलेले व वाफवलेले पदार्थ असतात. असे पदार्थ पचायला सोपे असतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात. याव्यतिरिक्त, येथील लोक अधिक प्रमाणात स्थानिक, घरगुती, रसायनमुक्त आणि नैसर्गिक पदार्थांचे सेवन करतात.

वज्रासनात बसून जेवणे: जमिनीवर वज्रासनात बसून जेवणे ही जपानी लोकांची एक अनोखी प्रथा आहे. यामुळे त्यांची पचनक्रिया सुधारते आणि गॅस, आम्लपित्त व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या टाळता येतात. तसेच, वज्रासनामुळे पाठीचा कणा सरळ राहतो.

रात्रीचं जेवण लवकर करणं : तज्ज्ञ नेहमी रात्रीचं जेवण लवकर करण्याची सल्ला देतात. ही एक चांगली सवय आहे. जपानमधील बहुतेक लोक या सवयीचं पालन करतात. ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीचं जेवण करतात, जी एक अतिशय आरोग्यदायी पद्धत आहे. यामुळे शरीराला रात्रीच्या वेळी विषमुक्त होण्यासाठी आणि स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. ही सवय अंगीकारल्याने तुम्हाला निरोगी राहण्यासही मदत होईल.

ग्रीन टीचे सेवन: जपानमध्ये ग्रीन टी मोठ्या प्रमाणावर प्यायली जाते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. ग्रीन टी प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे, आपल्या दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश केला पाहिजे. चालणे आणि सायकलिंग: जपानी लोक अन्न पचनासाठी चालतात आणि सायकल चालवतात. यामुळे त्यांना अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि आजार दूर राहतात. शिवाय, यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासही मदत होते.

योग, ध्यान आणि चांगली झोप: दररोज थोडा योग करा, काही मिनिटे ध्यान करा आणि पुरेशी झोप घ्या. या सवयी तुम्हाला तणाव, नैराश्य आणि आजारांपासून दूर ठेवतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मित्रांसोबत आठवड्यातून एकदा तरी भेटा. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहिल.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले