AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा

वार्षिक परीक्षा संपली की मुलांच्या आनंदाला पारावार राहत नाही. केरळमधील 15 वर्षांची श्रीनंदाही असाच आनंद साजरा करण्यासाठी कर्नाटकातील चिक्कमंगळुरूच्या डोंगररांगांमध्ये कुटुंबासोबत सहलीला गेली होती. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. दोन दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अखेर श्रीनंदाचा मृतदेह माणिक्यधारा धबधब्याजवळील दरीत आढळला.

सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो 'या' 5 चुका टाळा
मुलांसोबत फिरायाल जाताना अशी घ्या काळजी
| Edited By: | Updated on: Apr 11, 2026 | 1:30 PM
Share

निसर्गाचा आनंद कधी शोकांतिकेत बदलेल याचा नेम नसतो. कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथे सहलीला गेलेल्या श्रीनंदा या मुलीचा दरीत पडून झालेला मृत्यू ही केवळ एक अपघात नाही, तर प्रत्येक पालकासाठी दिलेली धोक्याची घंटा आहे. काही सेकंदांचे दुर्लक्ष किंवा ‘रील्स’चा मोह किती महाग पडू शकतो, हे या दुर्दैवी घटनेवरून समोर आले आहे. जर तुम्हीही मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या, पर्यटन स्थळांवर मुलांचा जीव धोक्यात पडू नये म्हणून कोणत्या 5 गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

केरळमधील पालक्कड येथील 15 वर्षीय श्रीनंदा हिचा कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथील बाबा बुदानगिरी डोंगर रांगांमध्ये झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. 10 वीची परीक्षा संपल्यानंतर आनंदाने सहलीला आलेली ही मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि दोन दिवसांनी तिचा मृतदेह दरीत आढळला. या घटनेने पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुलांसोबत फिरायला जाताना घ्यायची 5 महत्त्वाची काळजी

1. सेल्फी आणि रीलचा मोह टाळा

काही वेबसाईटच्या वृत्तांनुसार, श्रीनंदा बेपत्ता होण्यापूर्वी मोबाईलवर रील रेकॉर्ड करत होती. डोंगरदऱ्या किंवा धबधब्यांच्या ठिकाणी एका सेकंदाचे दुर्लक्षही जीवघेणे ठरू शकते. पालकांनी मुलांना कड्याच्या टोकावर जाऊन फोटो काढण्यापासून रोखले पाहिजे.

2. ‘हँड-होल्डिंग’ आणि देखरेख

विशेषतः धुक्याच्या ठिकाणी किंवा घनदाट जंगलात मुलांचा हात सोडू नका. श्रीनंदा ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाली, तिथून तिचा मृतदेह अवघ्या 150 मीटर अंतरावर सापडला. निसर्गात मुले पटकन डोळ्याआड होतात, त्यामुळे त्यांच्यावर सतत नजर ठेवा.

3. हवामान आणि स्थानिक परिस्थिती

चिक्कमंगळुरू किंवा सह्याद्रीसारख्या भागात हवामान क्षणात बदलते. धुक्यात रस्ता सापडणे कठीण होते. अशा वेळी मुलांच्या खिशात पालकांचा फोन नंबर आणि पत्ता असलेले ‘इमर्जन्सी कार्ड’ नेहमी ठेवावे.

4. योग्य पादत्राणे आणि कपडे

धबधब्यांच्या ठिकाणी दगड निसरडे असतात. मुलांच्या पायात ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज आहेत याची खात्री करा. साध्या चपलांमुळे पाय घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त असते.

5. आपत्कालीन शिट्टीचा वापर

ट्रेकिंग किंवा निर्जन ठिकाणी जाताना मुलांच्या बॅगेला एक शिट्टी बांधून ठेवा. जर मुले चुकून लांब गेली किंवा रस्ता चुकली, तर ओरडण्यापेक्षा शिट्टीचा आवाज लांबपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे त्यांना शोधणे सोपे होते.

Follow Us
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्.....
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्......
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली..
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली...
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती.
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल.