आंबे खरेदी करताय? तर ‘या’ 5 ट्रिक्स करा फॉलो, नाहीतर कॅमिकलयुक्त आंबा कराल खरेदी
आंब्याला फळांचा राजा असंच म्हटले जात नाही. कारण आंबा हा फळ खायला आणि आरोग्यासाठी तितकांच फायदेशीर आहे. तसेच उन्हाळ्याच्या हंगामातील आंबा हा फळ कधीकधी कॅमिकलयुक्त पद्धतीने पिकवलेला असतो. जो आरोग्यासाठी खुप हानिकारक ठरतो. यासाठी तुम्ही जेव्हा बाजारातून आंबे खरेदी करताना कॅमिकलयुक्त आंबा कसा ओळखायचा व नैसर्गिक पद्धतीने आंबा कोणता? हे आपण या ट्रिक्स फॉलो करू जाणून घेऊयात...

उन्हाळ्याच्या हंगामात आंबे खाण्याची वेगळीच मज्जा असते. आंब्याची आवड नसलेले असे क्वचितच लोकं असतात. पण उन्हाळा सुरू झाला म्हणजे आंबा खाण्याचा आनंद घेणे. या दिवसांमध्ये बाजारात आंब्यांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. केसर, तोतापुरी, हापूस, रत्नागिरी, चौसा, पायरी, नीलम, हिमसागर, मालगोवा, मालदा, लंगडा, असे विविध आंब्यांच्या प्रकारांनी बाजार भरलेला असतो. आंबा चविष्ट असण्यासोबतच पौष्टिकतेनेही समृद्ध आहे आणि त्याच्या सेवनाने अनेक आरोग्य फायदे होतात. मात्र आजकाल बाजारांमध्ये कॅमिकलच्या साहाय्याने पिकवलेले आंबे देखील विकतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. याचा परिणाम आंब्याच्या चवीवरही होतो. अशावेळेस आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे की कॅमिकल पद्धतीने पिकवलेले आहे हे ओळखणे खूप महत्वाचे आहे.
आजकाल अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत आहे हे खूप सामान्य झाले आहे, आणि आपण हेच भेसळयुक्त पदार्था खाल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे आजार होऊ शकतात. फळे आणि भाज्या लवकर पिकवण्यासाठीही कॅमिकलचा वापर केला जातो. तर आता आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे म्हणून कॅमिकल आणि नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे ते आपण आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
आंबा त्याच्या सालीवरून ओळखा
जर आंबा पिकवण्यासाठी कॅमिकलचा वापर केलेला असेल तर त्याच्या सालीला चमक येऊ शकते किंवा त्यावर पांढऱ्या-राखाडी पावडरचा थर येऊ शकतो. त्यामुळे बाजारात आंबे खरेदी करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. बहुतेक वेळा कॅल्शियम कार्बाइड वापरून आंबे पिकवले जातात.
रंगावरून आंबा ओळखा
आंब्याच्या सालीचा रंग जातीनुसार बदलतो, परंतु कॅमिकलचा वापर करून पिकवलेले बहुतेक आंब्यांची साल पूर्णपणे पिवळी किंवा पूर्णपणे नारिंगी असते. तर नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग सारखा नसून काही ठिकाणी तुम्हाला कच्चा हिरवट डाग दिसतील किंवा आंब्याच्या सालीवर काही ठिकाणी पिकलेला पिवळा डाग दिसतील.
चवीत तुरटपणा आहे
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा सुगंध आणि गोडवा तोंडात विरघळतो, तर कॅमिकल पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांची चव तुरट असू शकते आणि गोडवा सोबतच तुम्हाला तोंडात थोडी जळजळ जाणवू शकते.
तुम्ही आंबा कापून तपासू शकता
आंबे खरेदी करताना तुम्ही दुकानदाराला आंबा कापून दाखवायला सांगू शकता . तेव्हा आंब्यांचा रंग कसा आहे ते तपासू शकता . कारण कॅमिकल पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा रंग काही ठिकाणी हलका पिवळा असतो. तर काही ठिकाणी गडद पिवळा असतो.
तुम्ही या पद्धतींनी देखील ओळखू शकता
जर आंबे कॅमिकल पद्धतीने पिकवले तर त्यांचा आकार लहान असू शकतो कारण असे आंबे पिकण्याआधीच कच्चे झाडावरून काढले जातात. याशिवाय, जर आंब्यातून रस गळताना दिसत असेल तर ते कॅमिकल पद्धतीने पिकवलेले असू शकते. याशिवाय आंबा नैसर्गिक की कॅमिकल पद्धतीने पिकवलेला आहे यासाठी पाण्यात आंबे ठेऊन ओळखू शकता. यामध्ये आंबा पाण्याम टाकल्यावर लगेच तरंगताना दिसला तर तो आंबा खराब असू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
