Weight Loss : ब्राऊन शुगरचा ‘हा’ चहा प्या आणि वाढलेले वजन कमी करा!

ब्राऊन शुगरमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी सारख्या गुणधर्म आहेत. पांढर्‍या रंगाच्या साखरेपेक्षा ब्राउन शुगरवर रासायनिक प्रक्रिया कमी केलेल्या असतात.

Weight Loss : ब्राऊन शुगरचा 'हा' चहा प्या आणि वाढलेले वजन कमी करा!
चहा
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 10:17 AM

मुंबई : ब्राऊन शुगरमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी सारख्या गुणधर्म आहेत. पांढर्‍या रंगाच्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगरवर रासायनिक प्रक्रिया कमी केलेल्या असतात. ब्राऊन शुगर म्हणजे तपकिरी रंगाची साखर असते, जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ब्राऊन शुगरमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात ब्राऊन शुगरचा समावेश करा. (Drink brown sugar tea and lose weight)

दररोज सकाळी आपण ब्राऊन शुगरचा चहा घेतला तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. हा चहा घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन कप पाणी, दोन चमचे ब्राऊन शुगर आणि आद्रक लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. साधारण वीस मिनिटे गॅसवर चांगले उकळूद्या. त्यानंतर हा चहा गरम असताना प्या. ज्यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. हा चहा आपण दिवसातून कितीही वेळा घेऊ शकतो.

पांढर्‍या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. ब्राउन शुगर चयापचय दर वेगाने वाढवते. हे भूक कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. ब्राऊन शुगर पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे पोटा संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात मदत करते.

पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी, आपण एक ग्लास कोमट पाण्यात ब्राऊन शुगर मिक्स करून प्यावी. ब्राऊन शुगरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. तसेच त्यात एंटीसेप्टिक गुणधर्म आहेत. हे संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करते. म्हणून आपण ते अँटीसेप्टिक म्हणून वापरू शकता. दम्याचे रुग्ण पांढर्‍या साखरेऐवजी ब्राऊन शुगर वापरू शकतात. त्यामध्ये असणारे अॅन्टी-अॅलर्जी गुणधर्म दम्यावर मात करण्यास मदत करू शकतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drink brown sugar tea and lose weight)

Non Stop LIVE Update
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.