मुंबई : मॉर्निंग ड्रिंक्स आपल्या शरीरातील चयापचय नियंत्रित करतात आणि पोट साफ करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दिवसाच्या सुरुवातीला एक किंवा दोन लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिक कचरा साफ होतो आणि त्या बदल्यात आपल्याला स्वच्छ शरीर मिळते. पाण्याव्यतिरिक्त अशी अनेक पेये आहेत. जी निरोगी आणि स्वच्छ त्वचा मिळविण्यासाठी उपयुक्त आहेत. आम्ही आज तुम्हाला काही खास पेयांबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही मॉर्निंग ड्रिंक म्हणून घेऊ शकता.