AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : पावसाळ्याच्या हंगामात गरमा-गरम चहा प्यावा वाटतो? तर ‘या’ हर्बल टी नक्की ट्राय करा!

चहा ही एक अशी गोष्ट आहे ज्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही. प्रत्येकाला गरमा-गरम चहा प्यायला आवडतो. त्यामध्येही बाहेर संतधार पाऊस आणि थंड वातावरण म्हटल्यावर चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते.

Health Tips : पावसाळ्याच्या हंगामात गरमा-गरम चहा प्यावा वाटतो? तर 'या' हर्बल टी नक्की ट्राय करा!
चहा
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : चहा ही एक अशी गोष्ट आहे, ज्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही. प्रत्येकाला गरमा-गरम चहा प्यायला आवडतो. त्यामध्येही बाहेर संतधार पाऊस आणि थंड वातावरण म्हटल्यावर चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते. चहा आपल्याला रीफ्रेश करण्यासाठी तसेच दिवसभर ऊर्जा देण्यासाठी कार्य करते. आजही बहुतेक लोक नियमितपणे दुधाचाच चहा पितात. मात्र, आज बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक हर्बल टी मिळतात. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. (Drink these 5 herbal teas during the rainy season)

ग्रीन टी

ग्रीन टी जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे. यामध्ये चहाच्या पानांत असणारे उत्तेजक द्रव्य सामग्री फारच कमी असते, ते कॅमेलिया सायनेन्सिसच्या पानांपासून बनते. ऑक्सिडेशन रोखण्यासाठी ही पाने वाळवून शिजवतात. हे वेलची, तुळस, मध, लिंबू, आले, पुदीनाच्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आढळते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लठ्ठपणा कमी करण्याबरोबरच ग्रीन टी इतर आजारांपासूनही संरक्षण करते.

ग्रीन आईस टी

जर आपल्याला पावसाळ्यात निरोगी आणि रीफ्रेश पेय पिण्याची इच्छा असेल तर आपण ग्रीन आईस टी पिऊ शकता. यासाठी, आपल्याला पाणी उकळवावे लागेल आणि ग्रीन टी पिशवी मिसळावी लागेल आणि सुमारे पाच मिनिटांनंतर ते एका ग्लासमध्ये फिल्टर करावे लागेल. यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि काही पुदीना पाने घाला. आपण साखर किंवा मध वापरू शकता. हा चहा पिल्याने शरीर हायड्रेट राहिल.

ब्लॅक टी

ब्लॅक टी जगातील एक लोकप्रिय पेय आहे. या चहासह आपण आले आणि वेलची वापरू शकता. ब्लॅक टीला जपानमध्ये लाल चहा म्हणून ओळखले जाते. हा चहा पिल्याने मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, मूत्रपिंडातील स्टोन आणि इतर रोगांचा धोका कमी होतो.

हर्बल टी

हर्बल टी आले, पेपरमिंट, हिबिस्कस फुले, लिंबाचा रस मिसळून हर्बल टी बनविला जातो. हर्बल टीमध्ये कॅफिन नसते. या चहावर औषधी वनस्पती आणि फुलांचा वास येतो. नियमित चहापेक्षा हर्बल टी पिणे अधिक फायदेशीर आहे. यासह ते रोगांपासूनही आपल्याला दूर ठेवतात.

आद्रकचा चहा

आद्रकचा चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आल्याच्या चहामध्ये जिंझोल असते जे कर्करोग, रक्तदाब आणि मधुमेह सारख्या आजारांपासून बचाव करतो. हा चहा पिल्यामुळे सर्दी-ताप, खोकला कमी होतो. तसेच यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

(Drink these 5 herbal teas during the rainy season)

Follow Us
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता?
Chandrakant Khaire : मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता? चंद्रकांत खैरेंचा रोख नेमका कोणाकडे?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल