AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहामुळे दातावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

अनेक लोक जास्त प्रमाणात चहा घेतात. तुम्ही अगदी त्यांना चहाप्रेमी देखील म्हणू शकता. चहाप्रेमींना दिवसातून अनेकवेळा चहा लागतोच. काही लोक असेही आहेत, ज्यांनी चहा घेतला नाही तर त्यांचे डोके दुखायला लागते.

चहामुळे दातावर काय परिणाम होतात? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:52 PM
Share

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना वेळेवर जेवण नसले तरी चालेल पण चहा लागतोच. तुम्हाला अगदी असेही लोक दिसतील त्यांना प्रत्येक तासाला चहा लागतो. पण, जास्त चहा केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या दातांसाठी देखील हानिकारक आहे. हे तुम्हाला माहिती असायला हवं, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

चहाप्रेमींना चहाची इतकी आवड असते की त्यांना सकाळ व्यतिरिक्त कामाच्या वेळी चहा, आनंदी असल्यास चहा, टेन्शन असेल तर चहा लागतो. कुठेही ते आधी चहा पितात. पण, हा अति चहा देखील खूप हानिकारक आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्याने जसे नुकसान होते, तसेच चहा पिणे देखील खूप हानिकारक आहे. विशेषत: दुधाचा चहा कमी पिण्याचा सल्ला दिला जातो. सध्या जाणून घ्या की चहा केवळ तुमचं आरोग्यच नाही तर तुमचं हसणंही बिघडवू शकतो, म्हणजेच दातांनाही नुकसान पोहोचवतो.

कामाचा ताण कमी करण्यासाठी, आळस दूर करण्यासाठी किंवा झोपण्यापूर्वी चहा पिण्याची सवय असेल तर यामुळे झोपेची पद्धत बिघडू लागते. यामुळे मूडमध्ये चिडचिडेपणासारख्या समस्या उद्भवतात. सध्या चहामुळे दातांचे कसे नुकसान होते हे जाणून घेऊया.

दातांच्या वरच्या थराचे नुकसान

गरमागरम चहा पिण्याची अनेकांना सवय असते. चहा थोडाही थंड झाला तर तुम्हाला आवडत नाही, पण तुमच्या या सवयीमुळे दातांच्या इनेमलला म्हणजेच वरच्या थराला नुकसान पोहोचतं. यामुळे संवेदनशीलता येते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही काही गरम किंवा थंड, आंबट-गोड खाता तेव्हा दातांमध्ये तीव्र मुंग्या येऊ लागतात.

दातांचा रंग फिकट होतो

तुम्हीही रोज भरपूर चहा पित असाल तर जाणून घ्या की, यामुळे तुमच्या दातांचा नैसर्गिक पांढरा रंग फिकट होऊ शकतो आणि दात पिवळे दिसू लागतात, जे लाजिरवाणे ठरू शकते. खरं तर चहामध्ये टॅनिन नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे दातांच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळसरपणा किंवा डाग येऊ शकतात.

तोंडाची दुर्गंधी

तुम्ही जास्त चहा प्यायला तर यामुळे दातांच्या इनेमलचे नुकसान तर होतेच, पण तोंडाच्या स्वच्छतेवरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे बॅक्टेरियांच्या वाढीमुळे तोंडाची दुर्गंधी तुम्हाला त्रास देऊ शकते आणि इतरांसमोर तुम्हाला लाज वाटू शकते.

पोकळी होण्याची शक्यता

आपण दिवसातून अनेकवेळा चहा पिला तर यामुळे दातांवर प्लेग जमा होण्याची शक्यता असते. याशिवाय जर तुम्हाला जास्त गोड चहा प्यायला आवडत असेल तर ते अधिकच हानिकारक आहे. यामुळे दातांमध्ये पोकळी तर होईलच, शिवाय आरोग्यालाही हानी पोहोचेल. याशिवाय जास्त चहा प्यायल्याने कॅल्शियम शोषणात अडथळा निर्माण झाल्याने केवळ हाडेच नव्हे तर दातही कमकुवत होऊ शकतात.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान