तुम्हीही वजन कमी करण्यासाठी डाएट करत आहात? तर ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठी!

वजन कमी करण्यासाठी आपण व्यायामाबरोबरच डाएटिंगवरही विशेष लक्ष देतो. जर डाएटिंगचे योग्य पालन केले नाही तर आरोग्यास हानी पोहचू शकते. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक उपाशी देखील राहतात.

तुम्हीही वजन कमी करण्यासाठी डाएट करत आहात? तर 'ही' खास बातमी तुमच्यासाठी!
हेल्दी आहार

मुंबई : वजन कमी करण्यासाठी आपण व्यायामाबरोबरच डाएटिंगवरही विशेष लक्ष देतो. जर डाएटिंगचे योग्य पालन केले नाही तर आरोग्यास हानी पोहचू शकते. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक उपाशी देखील राहतात. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. आज आम्ही तुम्हाला डाएटमध्ये आपण सहसा करत असलेल्या चुकांबद्दल सांगणार आहोत. (Follow these tips when dieting to lose weight)

नाश्ता करणे

नाश्ता हा आपल्या संपूर्ण दिवसाचा सर्वात महत्वाचा आहार आहे. त्यामध्ये फायबर, कार्ब आणि प्रथिने असावीत जेणेकरुन आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळेल. म्हणूनच सकाळी नाश्ता न करणे ही आपली सर्वात मोठी चूक आहे. या सवयीमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

कमी कार्बोहायड्रेट आहार

वजन कमी करण्यासाठी आहार घेत असताना आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे न घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आहारात सहसा कार्ब, चरबी आणि कॅलरीचे प्रमाण कमी होते. यामुळे, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण देखील कमी होते. यामुळे डाएटदरम्यान आपण हेल्दी आहार घेतला पाहिजेत.

सलाद खा

सलाड खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. विशेष म्हणजे सलाड खाल्ल्याने आपले वजन झटपट कमी होते. सलाड तयार करण्यासाठी जास्तीत-जास्त हिरव्या भाज्यांचा वापर केला पाहिजे. फायबर्सने परिपूर्ण असे सलाड खाल्ल्याने पोटातील जमा विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात.

जास्त पाणी प्या

पाणी पिण्याने शरीरातील घातक गोष्टीबाहेर पडतात आणि शरीरात साठलेली जादा चरबी कमी होते. ज्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो. यामुळे डाएटदरम्यान जास्त पाणी पिण्यावर भर द्या. पाणी पिणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी देखीप खूप फायदेशीर आहे.

व्यायाम देखील महत्त्वाचा

डाएट प्लॅनसह दररोज किमान 30 मिनिटांसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. आपण दररोज किमान 30 मिनिटांसाठी कोणत्याही प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत. याशिवाय नाश्ता किंवा भोजन वगळू नये, अन्यथा अशक्तपणा येऊ शकतो.

हे लक्षात ठेवा

डाएट प्लॅन सुरु असताना हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की, सर्व लोकांचे शरीर एकसारखे नसते. डाएटचे पालन केल्यास काही लोकांचे वजन कमी जलद गतीने कमी होईल, इतर कोणाला त्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो.

(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Running Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी!

सॅल्मोन माशाचे शरीराला 10 फायदे, थायरॉईड अॅनेमिया आजारांवर गुणकारी

(Follow these tips when dieting to lose weight)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI