AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Water Day 2021 : गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे देखील ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या…

आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते.

World Water Day 2021 : गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे देखील ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या…
पाणी
| Updated on: Mar 22, 2021 | 12:29 PM
Share

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. मात्र, शरीरासाठी पाणी पिणे फायदेशीर असल्यामुळे काही लोक प्रमाणाच्या बाहेर पाणी पितात. (Drinking too much water is also dangerous to health)

याचे घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. चला तर मग बघूयात आपल्या शरीरासाठी किती पाणी पिणे योग्य आहे. तज्ज्ञांच्या मते, निरोगी शरीरासाठी दोन लिटर ते चार लिटर पाणी पुरेसे आहे. परंतु जर आपण व्यायाम किंवा कठोर परिश्रम घेत असला तर पाच ते सहा लिटर पाणी प्यावे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, पाणी कमी पिले किंवा जास्त पिले तरी ते आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.

पाणी पिण्याने शरीरातील घातक गोष्टीबाहेर पडतात आणि शरीरात साठलेली जादा चरबी कमी होते. ज्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो. परंतु जर आपण दररोज जास्त पाणी पित असाल तर मूत्रपिंडा संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते जेवणादरम्यान पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतु, जेवण खाण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते.

वास्तविक, खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे जठरासंबंधी रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एंजाइममध्ये विरघळून जातात. ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसे पोषकद्रव्य मिळत नाही. याशिवाय गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या होण्याचीही शक्यता निर्माण होते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की, शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तप्नाम कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.

परंतु, हिवाळ्यामध्ये लोक पाणी पिण्यास टाळाटाळ करतात आणि यामुळे आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो. जास्त थंड पाणी पिण्यामुळे शरीरात कमजोरी येते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोकाही वाढतो. तांबेच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी या भांड्यातील पाणी प्या. सलग तीन महिने असे केल्याने तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढेल. तसेच, आपल्याला मुरुम किंवा त्वचेची समस्या असल्यास ते या आजारांपासूनही आपली सुटका करते.

संबंधित बातम्या : 

(Drinking too much water is also dangerous to health)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.