Fruit Kheer Recipe : हेल्दी राहण्यासाठी फ्रूट खीरचा आहारामध्ये समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!
जवळपास खीर ही प्रत्येकाची आवडती डिश आहे. ही स्वादिष्ट मिठाई प्रत्येक सणाला बनवली जाते. फ्रूट खीर ही अतिशय आरोग्यदायी रेसिपी आहे. ही बनवायला सोपी रेसिपी आपण कोणत्याही सणामध्ये तयार करू शकता. दिवाळी आणि राखी सारख्या सणांसाठी एक उत्तम डिश आहे.

मुंबई : जवळपास खीर ही प्रत्येकाची आवडती डिश आहे. ही स्वादिष्ट मिठाई प्रत्येक सणाला बनवली जाते. फ्रूट खीर ही अतिशय आरोग्यदायी रेसिपी आहे. ही बनवायला सोपी रेसिपी आपण कोणत्याही सणामध्ये तयार करू शकता. दिवाळी आणि राखी सारख्या सणांसाठी एक उत्तम डिश आहे. या स्वादिष्ट रेसिपीमध्ये सफरचंद, द्राक्षे आणि डाळिंब यासारख्या आणखी काही फळांचा समावेश करू शकता. ही एक अतिशय चवदार रेसिपी आहे.
फ्रूट खीरचे साहित्य
दूध – 1 लिटर
चवीनुसार साखर – 1/2 कप
हंगामी फळे – 1 कप
केळी, सफरचंद, आंबा, पीच किंवा नाशपाती, द्राक्ष
केशर – 6-7
वेलची पावडर – 1/2 टीस्पून
कॉर्न स्टार्च -1-2 टीस्पून
सुकामेवा
फ्रूट खीर कशी बनवायची जाणून घ्या पध्दत
स्टेप- 1
भांड्यात दूध मंद आचेवर उकळवा. दूध घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
स्टेप- 2
दुसर्या नॉन-स्टिक पॅनमध्ये फळे, सफरचंद आणि नाशपाती/पीच घाला. 1 टीस्पून साखर घाला आणि काही मिनिटे शिजवा.
स्टेप- 3
आता एका भांड्यात कॉर्न स्टार्च आणि थोडे पाणी घालून गुठळ्या नसलेली पेस्ट बनवा. आता ते उकळत्या दुधात घाला आणि मिक्स करा.
स्टेप- 4
आता त्यात साखर आणि केशर घालून मिक्स करा. दूध घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. वेलची पूड घाला. आता थंड होऊ द्या. आता सर्व कापलेली आणि भाजलेली फळे दुधात घाला. ते चांगले मिसळा.
फळे आरोग्यासाठी फायदेशीर
केळी हे सर्वात पौष्टिक फळांपैकी एक आहे. जे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. यामध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. या फळामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी असते. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर, खनिजे आणि इतर अनेक पोषक घटक आहेत. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. द्राक्षांमध्ये अनेक पोषक घटक असतात. द्राक्षांमध्ये फायबर, प्रथिने, लोह, तांबे, फोलेट, जीवनसत्त्वे सी, ए, के आणि बी इ. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Fruit Kheer beneficial for health)
