लठ्ठपणा कमी करण्यासाठी आलं आणि बडीशेपचं पाणी अत्यंत फायदेशीर, वाचा!

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. बरेच लोक लठ्ठपणा कमी करण्याासाठी औषधांचा अवलंब देखील करतात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आलं आणि बडीशेपचं पाणी अत्यंत फायदेशीर, वाचा!
वाढलेले वजन

मुंबई : लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. बरेच लोक लठ्ठपणा कमी करण्याासाठी औषधांचा अवलंब देखील करतात. तरी देखील वजन कमी होत नाही. जर तुम्ही पण लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर प्रथम लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला जेवनाच्या वेळा बदलाव्या लागतील. (Ginger and saunf water are beneficial for weight loss)

तसेच आपण काही खास पेय घेऊनही लठ्ठपणा कमी करून शकतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आद्रक आणि बडीशेपच खास पेय अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला आद्रकचे चार तुकडे आणि तीन चमके बडीशेप लागणार आहे. सर्वात अगोदर आद्रक आणि बडीशेप मिक्स करून घ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये उकळण्यासाठी ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी गॅसवर उकळूद्या. त्यानंतर गरम असतानाच चहा सारखे प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल.

बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी असून त्यात कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक खनिज पदार्थांचा समावेश आहे. बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत.

आद्रकमध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात, हे आपले पचन सुधारण्यासाठी कार्य करते. याव्यतिरिक्त, त्यात जळजळ कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत. आद्रकमध्ये पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. आद्रकचे सेवन केल्याने आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Ginger and saunf water are beneficial for weight loss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI