AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Immunity Booster Food : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओमेगा-3चे 6 मुख्य स्त्रोत, वाचा याबद्दल अधिक!

कोरोनाव्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना, सरकार तिसर्‍या लाटेची तयारी करत आहे.

Immunity Booster Food : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओमेगा-3चे 6 मुख्य स्त्रोत, वाचा याबद्दल अधिक!
ओमेगा-3
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 12:26 PM
Share

मुंबई : कोरोनाव्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना, सरकार तिसर्‍या लाटेची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत आपला थोडासा निष्काळजीपणा आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. म्हणूनच आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असे पदार्थ आहारात घेतले पाहिजे. (Include omega-3 rich foods in your diet to boost your immune system)

ओमेगा -3 अॅसिड आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर कॅलरी असतात, जे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. यासह, हे हृदयाशी संबंधित रोग आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास देखील मदत करते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. ओमेगा -3 मध्ये तीन प्रकारचे अॅसिड प्रामुख्याने आढळतात. ओमेगा -3 नेमके कोणत्या पदार्थांमधून शरीराला मिळते हे आपण बघणार आहोत.

जवस आणि सब्जा

जवस आणि सब्जामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. या बिया लोह, मॅग्नेशियम, फायबर समृद्ध आहेत, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. चयापचय प्रक्रियेदरम्यान उत्पादित मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास जवस आणि सब्जा मदत करते.

अक्रोड

अक्रोड् ओमेगा- 3 अॅसिड समृद्ध असतात. जे हृदयासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यासह, अक्रोडमुळे तुमची भूक शांत होते आणि तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. अक्रोडमध्ये मोनोसेच्युरेटेड फॅट असते जे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

मासे

ओमेगा -3 माशांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. सॉल्मन आणि मॅकरेल मासांमध्ये ओमेगा -3 जास्त आढळते. या माशांमध्ये प्रथिने आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते जे स्नायू दुरुस्त करण्यात मदत करते. यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोकाही कमी होतो. यात बी -12, डी आणि सेलेनियम जीवनसत्त्वे असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये कॅलरी खूप कमी असतात आणि अँटी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असतात. त्यात अँटी-ऑक्सिडेंट असतात ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. हे शरीरातील एलडीएल आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. ओमेगा -3 त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, यामुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यात मदत होते.

सोयाबीन

सोयाबीन ओमेगा -3 समृद्ध आहे. या व्यतिरिक्त, भरपूर प्रथिने आणि फायबर सोयाबीनमध्ये असते. सोयाबीनचे नियमित सेवन केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो.

फुलकोबी

फुलकोबीचे भाजी म्हणून आहारात सेवन केले जाते. फुलकोबीमध्ये ओमेगा -3 चे प्रमाण अधिक असते. यात मॅग्नेशियम, नियासिन आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक असतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include omega-3 rich foods in your diet to boost your immune system)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?