Weight loss Tips : लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? मग ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा आणि वेगाने वजन कमी करा!

वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायामावरच नव्हे तर आहारावरही विशेष लक्ष दिले पाहिजे. आपण आपल्या आहारात तळलेल्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे.

Weight loss Tips : लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? मग 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा आणि वेगाने वजन कमी करा!
वेट लॉस

मुंबई : वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायामावरच नव्हे तर आहारावरही विशेष लक्ष दिले पाहिजे. आपण आपल्या आहारात तळलेल्या गोष्टींचे सेवन करणे टाळावे. त्याऐवजी फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा. हे आपल्या चयापचयला चालना देते जे वजन कमी करण्यास मदत करते. दररोज सकाळी आपण साधारण एक तास व्यायाम केला पाहिजे. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. (Include these 5 foods in your diet for weight loss)

ओट्स

वजन कमी करण्यासाठी आहारात ओट्स, उपमा, इडली, ओट्स खिचडी यासारख्या अनेक प्रकारच्या स्वादिष्ट अन्नाचा समावेश केला पाहिजे. ओट्समध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते. परंतु प्रथिने आणि फायबर खूप जास्त असतात. त्यामध्ये असलेले पोषक चयापचय वाढविण्याचे कार्य करतात, ज्यामुळे पोट निरोगी राहण्यास मदत होते. बेलीची चरबी कमी करण्यासाठी ओट्स खूप फायदेशीर असतात. दररोज ओट्स खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सोयाबीन

2015 मध्ये Journal Molecules केलेल्या अभ्यासानुसार, सोयाबीन हानिकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि ओटीपोटातील चरबी जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते. सोयाबीन फायबर समृद्ध असते जे चयापचय वाढविण्याचे कार्य करते. हे एक वनस्पती आधारित प्रथिने आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात सोयाबीनचा समावेश करा.

राजमा

राजमा प्रोबायोटिक म्हणून काम करते. म्हणजे ते खाल्ल्याने पाचन क्रिया हळू होते, जेणेकरून आपले शरीर प्रत्येक आहाराचे पोषण अॅब्जार्ज करू शकेल. परंतु याचा अधिकाधिक लाभ तुम्हाला हवे असल्यास भाजी बनवून खाण्याऐवजी उकडून खाणे अधिक चांगले आहे. विशेष म्हणजे राजमामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टी

दररोज 2-3 कप ग्रीन टी चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, तसेच अतिरिक्त चरबी कमी होते. आपण दररोज व्यायामापूर्वी किंवा नंतर ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टी हायड्रेटेड ठेवण्याशिवाय, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. त्याशिवाय हे अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे जे त्वचा स्वच्छ करून मुक्त रॅडिकल्सपासून मुक्त होण्यास मदत करते.

पपई

पपईमध्ये पपाइन नावाचे पाचक एंजाइम असते. जे चयापचय वाढविण्यास तसेच फॅट कमी करण्यास मदत करते. पचन क्रिया मजबूत करण्यासाठी सकाळी रिक्त पोटी पपई खाणे फायद्याचे आहे. पपईमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. पपई खाल्याने आपले पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. याशिवाय हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these 5 foods in your diet for weight loss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI