Health Care : ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा आणि चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे दूर करा!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 07, 2021 | 10:11 AM

प्रत्येकाला आपले वाढलेले वय लपवायचे असते, वय लपवण्यासाठी बरेच लोक केसांना मेहंदी वगैरे लावतात. परंतु आपल्या वाढत्या वयाचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो.

Health Care : 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा आणि चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे दूर करा!
निरोगी आहार

मुंबई : प्रत्येकाला आपले वाढलेले वय लपवायचे असते, वय लपवण्यासाठी बरेच लोक केसांना मेंहदी वगैरे लावतात. परंतु आपल्या वाढत्या वयाचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि अनहेल्दी खाण्यामुळे 35 व्या वयातच आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास सुरूवात होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वाढलेल्या वयाचा प्रभाव त्वचेवर न दिसण्यासाठी आपण आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे. (Include these foods in the diet and eliminate the symptoms of aging)

मोड आलेले कडधान्य : दररोज सकाळी नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्य आपण खाल्ले पाहिजेत. मूग, हरभरा, मडकी, सोयाबीन इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील प्रथिनेची कमतरता दूर होते तसेच त्वचेला आतून ताजेतवाने ठेवणारे सर्व जीवनसत्त्वे आणि खनिज यामुळे मिळतात.

टोमॅटो : टोमॅटो खावे आणि त्वचेवर लावणे फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये लाइकोपीन आढळते जे त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. हे आपल्या शरीरास वृद्ध होण्यापासून वाचवते. म्हणून, रोज सकाळी एक टोमॅटो खा आणि त्वचेवर चोळा.

हिरव्या भाज्या : गाजर, पालक, मेथी, काकडी, दुधी भोपळा, मुळा, हिरव्या भाज्या खाल्ल्यास शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले होते. यामुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसेच यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते.

ग्रीन टी : ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टी अँटी ऑक्सिडंट्ससह त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास खूप उपयुक्त आहे. तसेच ग्रीन टी शरीरातील अतिरिक्त चरबी आणि विषारी पदार्थ काढून टाकते.

ओमेगा : 3 ज्या खाद्यपदार्थामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड आढळते ते केवळ त्वचाच नव्हे तर आरोग्यासाठी देखील अतिशय चांगले मानले जातात. ते खाल्ल्याने त्वचेला कडकपणा येतो. यासाठी आपण आपल्या आहारात अक्रोड, फ्लेक्ससीड्स, बदाम आणि मासे इत्यादींचा समावेश करावा.

पाणी : जर त्वचेला चमकदार ठेवायचे असेल तर शरीरातून विषारी घटक काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. यासाठी पाण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. म्हणून दिवसभर किमान तीन ते चार लिटर पाणी प्या.

हळद दूध : हळद फक्त अँटीबायोटिकच नाही तर त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. हळदीच्या वापरामुळे त्वचा खूप चमकते. म्हणून, दररोज रात्री झोपायच्या आधी हळदीचे दूध घ्या.

हे सर्वात महत्वाचे : स्वत: ला जास्त काळ तरूण ठेवण्यासाठी, त्वचेसह आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. यासाठी आहार सुधारण्याबरोबर रोज व्यायाम आणि प्राणायाम करावा. हे आपले शरीर सक्रिय ठेवते. या व्यतिरिक्त जड अन्न, जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजेत.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these foods in the diet and eliminate the symptoms of aging)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI