AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त ताजेपणा नाही, तर भाज्या खरेदी करताना “या” गोष्टीही कायम लक्षात ठेवा

भाजी निवडताना फक्त किंमत आणि ताजेपणा नाही, तर त्यांचा रंग आणि आकारही तपासा. प्रत्येक भाजीचं वेगळेपण समजून घेतलं तर तुमच्या जेवणात स्वाद आणि पोषणाची जोड अगदी सहज मिळेल. बाजारातून ताजी आणि योग्य आकाराच्या भाज्या निवडून तुम्ही तुमच्या कुटुंबाला स्वादिष्ट आणि निरोगी जेवण देऊ शकता.

फक्त ताजेपणा नाही, तर भाज्या खरेदी करताना या गोष्टीही कायम लक्षात ठेवा
vegetables Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 11, 2025 | 4:00 PM
Share

भाज्या खरेदी करताना आपण सहसा त्यांचा ताजेपणा आणि किंमतच पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की भाज्यांचा रंग आणि आकार यावरूनही त्यांचा स्वाद आणि पोषण किती आहे, हे समजू शकतं? बाजारात भाज्या निवडताना थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. योग्य भाजी निवडली तर जेवणाचा स्वाद तर वाढतोच पण आरोग्यालाही फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया, कोणती भाजी कोणत्या कारणासाठी उत्तम आहे.

शिमला मिरची

तीखट जेवण आवडणाऱ्यांसाठी तीन खड्डे असलेली शिमला मिर्च उत्तम आहे. यात तिखटपणा जास्त असतो आणि भाजी बनवण्यासाठी ही सर्वोत्तम मानली जाते. ही शिमला मिरची तेलात परतल्यावर त्याचा स्वाद आणि सुगंध जेवणाला वेगळीच चव देतो.

चार खड्डे असलेली शिमला मिरची ही हलकी गोड असते. त्यामुळे पिझ्झा, सँडविच आणि सलादसाठी ती उत्तम पर्याय आहे. यात तिखटपणा कमी असतो त्यामुळे हलक्या स्वादाच्या पदार्थांसाठी ती योग्य ठरते.

गाजर

ज्यूस किंवा गाजराचा हलवा बनवायचा असेल तर गडद लाल रंगाचं गाजर निवडा. यात गोडवा जास्त असतो आणि रंगही छान दिसतो. गडद लाल रंगाच्या गाजरात बीटा-कॅरोटीनचं प्रमाणही जास्त असतं हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

नारंगी रंगाचं गाजर हे भाजी आणि सलादसाठी चांगलं आहे. याचा स्वाद हलका असतो आणि मीठ-लिंबू घालून खाल्ल्यास त्याची चव अप्रतिम लागते.

वांगी

वांग्याचे भरीत करण्यासाठी गोल आकाराची वांगी घ्या. यात बिया कमी आणि गर जास्त असतो, त्यामुळे उत्तम स्वाद मिळतो. गोल वांग्यांचा वापर पारंपरिक भारतीय पदार्थांमध्ये जास्त होतो, कारण त्यांची चव तव्यावर भाजल्यावर खुलते.

आकाराने मोठी (लांब) वांगी ही भाजी बनवण्यासाठी उत्तम आहे. कापल्यानंतर ती लवकर शिजतात आणि चवीला छान लागतात. लांब वांग्यांचा वापर आंध्र आणि दक्षिण भारतीय शैलीतील भाज्यांमध्ये खूप होतो.

कोबी

गडद हिरव्या रंगाची कोबी निवडल्यास त्यात चव, जीवनसत्त्वं आणि खनिजांचं प्रमाण जास्त मिळतं. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ती फायदेशीर आहे. या कोबीत अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. लक्या हिरव्या रंगाची कोबी ही पोषक तत्त्वांच्या बाबतीत थोडी कमी असते आणि चवही हलकी असते. सलाद किंवा फास्ट फूडमध्ये ती जास्त पसंत केली जाते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.